शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी पुलाचे उद्घाटन मंत्र्यांना करू देणार नाही - : कृती समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 00:40 IST

पर्यायी शिवाजी पुलाच्या उद्घाटनाचा प्रश्न चिघळला असून, पालकमंत्री अगर इतर मंत्र्यांना या पुलाचे उद्घाटन करू दिले जाणार नाही. जनरेट्यामुळे पुलाचे काम पूर्ण झाले असल्याने त्याचे श्रेय घेण्यासाठी कोणीही प्रयत्न करू नये; त्याऐवजी सामान्य नागरिकांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन करण्यात यावे, असा पवित्रा सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने

ठळक मुद्दे राष्टय महामार्ग विभागात बैठक; नागरिकांच्या हस्ते करा

कोल्हापूर : पर्यायी शिवाजी पुलाच्या उद्घाटनाचा प्रश्न चिघळला असून, पालकमंत्री अगर इतर मंत्र्यांना या पुलाचे उद्घाटन करू दिले जाणार नाही. जनरेट्यामुळे पुलाचे काम पूर्ण झाले असल्याने त्याचे श्रेय घेण्यासाठी कोणीही प्रयत्न करू नये; त्याऐवजी सामान्य नागरिकांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन करण्यात यावे, असा पवित्रा सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने बुधवारी घेतला.

पुलाच्या उद्घाटनावरून सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने निमंत्रक आर. के. पोवार यांच्या नेतृत्वाखाली राष्टÑीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक भोसले यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. भोसले यांनी याप्रश्नी शासन आणि कृती समिती यांच्यात समन्वयाने मार्ग काढू, असे आश्वासन दिले.

पर्यायी शिवाजी पुलाचे काम जनरेट्यामुळे झाल्याची भावना कृती समितीने बैठकीत व्यक्तकेली; त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने पुलाचे उद्घाटन करून वाहतूक सुरळीत करावी, असे सुचविण्यात आले. पुलाच्या पश्चिमेकडील बाजूने ग्रामीण भागातील जनता तर पूर्वेकडून शहरातील सामान्य नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन केले जाईल, अशीही माहिती बाबा पार्टे यांनी दिली. कार्यकारी अभियंता भोसले यांनी उद्घाटन कार्यक्रमात अडचणी आणू नये, पुलाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे येणार आहेत. त्याबाबतचा कार्यक्रम हा दिल्लीमध्ये ठरणार असल्याचे सांगितले.

पुलाचे काम १०० टक्केपूर्ण झाल्यास त्यावरून वाहतूक सुरू करावी, उद्घाटनाबाबत मंत्र्यांबाबतीत जनतेत रोष असल्याची माहिती वरिष्ठ पातळीवर प्रशासनास कळवावी, असेही यावेळी आर. के. पोवार यांनी सांगितले. त्यावेळी प्रशासनातील अधिकारी आणि जनता यांच्यात समन्वयाने तोडगा काढण्यात यावा, असाही प्रस्ताव यावेळी पुढे आला.या बैठकीत संभाजीराव जगदाळे, किशोर घाटगे, नामदेवराव गावडे, अशोक पोवार, सतीशचंद्र कांबळे, स्वप्निल पार्टे, रमेश मोरे, जयकुमार शिंदे यांनीही भावना व्यक्तकेल्या व मंत्र्यांनी उद्घाटन करू नये, अशी ठाम भूमिका घेतली. जनतेच्या रोषाची भूमिका आपण जिल्हा प्रशासनास कळवावी, असे कार्यकारी अभियंता भोसले यांनी आंदोलकांना सांगितले. या बैठकीस प्रसाद जाधव, बी. एल. बरगे, किसन कल्याणकर, पंडितराव सडोलीकर, आदी उपस्थित होते.आठवड्यात उद्घाटन, नियोजन सुरुपर्यायी पुलाचे उद्घाटन आठवड्याभरात होण्याची शक्यता आहे. त्याबाबतची तारीख दिल्लीतून निश्चित होणार आहे. या पुलाचे उद्घाटन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत होण्याची शक्यता आहे. त्याबाबतचे नियोजन करण्याचे काम वरिष्ठ पातळीवरून ठरणार आहे....तर कोनशिला फोडणारपुलाच्या उद्घाटनाच्या कोनशिलावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव आल्यास कोनशिला फोडणार, तसेच काळे फासण्याचा इशारा यावेळी बैठकीत देण्यात आला.पर्यायी शिवाजी पुलाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने बुधवारी सायंकाळी राष्टÑीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक भोसले यांची भेट घेऊन चर्चा केली.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाNitin Gadkariनितीन गडकरीchandrakant patilचंद्रकांत पाटील