शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

शिवाजी विद्यापीठाचा ‘पर्ड’शी करार

By admin | Updated: October 24, 2015 01:18 IST

कंपवात, स्मृतिभ्रंशावरील संशोधनात विद्यापीठाचे पुढचे पाऊल

कोल्हापूर : ज्येष्ठ नागरिकांना उतारवयात सामोरे जाव्या लागणाऱ्या कंपवात आणि स्मृतिभ्रंश या दोन रोगांवरील संशोधनाबाबत शिवाजी विद्यापीठाचा जैवतंत्रज्ञान अधिविभाग व अहमदाबाद (गुजरात) येथील बी. व्ही. पटेल फार्मास्युटिकल एज्युकेशन अ‍ॅँड रिसर्च सेंटर (पर्ड) यांच्यात शुक्रवारी सामंजस्य करार केला.विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सामंजस्य करारावर प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी, तर ‘पर्ड’कडून संचालक डॉ. मनीष निवसरकर यांनी स्वाक्षरी केली. यावेळी ‘बीसीयूडी’चे संचालक प्राचार्य डॉ. डी. आर. मोरे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, प्रा. विश्वास बापट व जैवतंत्रज्ञान अधिविभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. ज्योती जाधव उपस्थित होते. विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागात डॉ. ज्योती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सात वर्षांपासून कंपवात (ढं१‘्रल्ल२ङ्मल्ल२ ऊ्र२ीं२ी) व स्मृतिभ्रंश (अ’९ँी्रेी१ ऊ्र२ीं२ी) या मेंदूशी संबंधित रोगांवरील संशोधन सुरू आहे. त्यांच्या उपचारांसाठी लागणाऱ्या औषधांपैकी एल-डोपा व गॅलेंटामाइन या नैसर्गिक स्वरूपात असणाऱ्या पश्चिम घाटामधील दुर्मीळ वनस्पतींचा सखोल अभ्यास या संशोधनांतर्गत केला जात आहे. डॉ. जाधव यांचे शोधनिबंध आंतरराष्ट्रीय जर्नल्समधून प्रकाशितही झाले आहेत. तसेच दोन पेटंट्सही फाइल केले आहेत. (प्रतिनिधी)कंपवात व स्मृतिभ्रंश या रोगांसंदर्भातील संशोधनात शिवाजी विद्यापीठ देशात आघाडीवर असून, त्याला जगन्मान्यता लाभत आहे. या रोगांवरील उपचारांसाठी सदर सामंजस्य करारातून नक्कीच योग्य पर्याय उपलब्ध होऊ शकेल. या करारांतर्गत संशोधक विद्यार्थ्यांची देवाणघेवाण तसेच संशोधनासाठी काही नवीन संयुक्त प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत.- डॉ. ज्योती जाधव