शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी विद्यापीठाचा जिल्हास्तरीय युवा महोत्सव शनिवारी रंगणार महावीर महाविद्यालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 14:01 IST

शिवाजी विद्यापीठाचा ३८ वा जिल्हास्तरीय युवा महोत्सव महावीर महाविद्यालयात शनिवारी (दि. २७) होणार आहे. विविध ११ कलाप्रकारांमध्ये होणाऱ्या महोत्सवासाठी ५३ संघांनी नोंदणी केली आहे. या संघाच्या माध्यमातून सुमारे ११०० विद्यार्थी कलाकार सहभागी होणार आहेत, अशी माहिती महावीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. पी. लोखंडे आणि युवा महोत्सवाचे सचिव डॉ. अरुण पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देमहावीर महाविद्यालयात शनिवारी रंगणार जिल्हास्तरीय युवा महोत्सव५३ संघांची नोंदणी; विविध ११ कलाप्रकारांचा समावेश

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा ३८ वा जिल्हास्तरीय युवा महोत्सव महावीर महाविद्यालयात शनिवारी (दि. २७) होणार आहे. विविध ११ कलाप्रकारांमध्ये होणाऱ्या महोत्सवासाठी ५३ संघांनी नोंदणी केली आहे. या संघाच्या माध्यमातून सुमारे ११०० विद्यार्थी कलाकार सहभागी होणार आहेत, अशी माहिती महावीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. पी. लोखंडे आणि युवा महोत्सवाचे सचिव डॉ. अरुण पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.प्राचार्य लोखंडे म्हणाले, युवा महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी सकाळी दहा वाजता खासदार धनंजय महाडिक, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. महाविद्यालयाच्या श्री आचार्य विद्यानंद सांस्कृतिक भवनमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री आचार्यरत्न देशभूषण शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन अ‍ॅड. के. ए. कापसे असणार आहेत.महोत्सवात एकांकिका, लघुनाटिका, पथनाट्य, लोकसंगीत वाद्यवृंद, लोककला, लोकनृत्य, मूकनाट्य, सुगम गायन, भारतीय समूहगीत, वादविवाद, वक्तृत्व आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा होणार आहेत. सचिव डॉ. पाटील म्हणाले, महोत्सवासाठी महाविद्यालयाच्या परिसरात पाच रंगमंच उभारण्यात आले आहेत. तयारी पूर्ण झाली आहे. या पत्रकार परिषदेस सुरेश मसुटे उपस्थित होते.

देशभूषण हायस्कूलमध्ये होणार पेपरया महोत्सवामुळे महावीर महाविद्यालयात शनिवारी होणाऱ्या परीक्षांचे ठिकाण बदलण्यात आले आहे. सोमवार पेठेतील देशभूषण हायस्कूलमध्ये या दिवशी नियोजित वेळेत बी. ए. भाग एक (सत्र दोन), भूगोल, शारीरिक शिक्षण, बी. एस्सी. भाग एक (सत्र दोन), बी.ए.बी.एड. भाग दोन (सत्र तीन), इंग्रजी आवश्यक या विषयांचे पेपर होतील, अशी माहिती प्राचार्य लोखंडे यांनी दिली.

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर