शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी विद्यापीठ ठरले ‘ग्रीन चॅम्पियन’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 12:13 IST

शिवाजी विद्यापीठाने यावर्षी प्रथमच या स्पर्धेत सहभाग नोंदविला आणि गेल्या काही वर्षांत जलव्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात केलेल्या कामाच्या बळावर जिल्हा स्तरावर प्रथम पुरस्कार प्राप्त केला. 

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ हे केंद्र सरकारच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षण परिषदेच्या यावर्षीच्या ‘कोल्हापूर जिल्हा ग्रीन चॅम्पियन’ पुरस्काराचे मानकरी ठरले आहे. त्याची माहिती या परिषदेचे अध्यक्ष डॉ. डब्ल्यू. जी. प्रसन्न कुमार यांनी ई-मेलद्वारे विद्यापीठ प्रशासनाला सोमवारी दिली.या परिषदेमार्फत दरवर्षी स्वच्छ कॅम्पस इन्स्टिट्यूशनल पुरस्कार प्रदान केले जातात. याअंतर्गत जिल्हा स्तरापासून ते केंद्रीय स्तरापर्यंत विविध शैक्षणिक संस्थांच्या परिसराची स्वच्छता आणि हरितपणा या मूलभूत निकषांवर निवड करून त्यांना पुरस्कार प्रदान करून प्रोत्साहित करण्यात येते. शिवाजी विद्यापीठाने यावर्षी प्रथमच या स्पर्धेत सहभाग नोंदविला आणि गेल्या काही वर्षांत जलव्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात केलेल्या कामाच्या बळावर जिल्हा स्तरावर प्रथम पुरस्कार प्राप्त केला. दरम्यान, विद्यापीठाने गेल्या काही वर्षांत राबविलेल्या जल व्यवस्थापन अभियानामुळे विद्यापीठ परिसर पाणी वापराच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे. दर मोसमात विद्यापीठ साधारण ३१ कोटी लिटर पाण्याचे संवर्धन करते. त्याचबरोबर दररोज चार लाख लिटर सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करून ते उद्यानांसाठी वापरले जाते. एकूण वीज वापरापैकी १६ टक्के वीज ही सौरऊर्जेपासून मिळविली जाते. 

विद्यापीठाने आपल्या ८५३ एकर क्षेत्रावर वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. विद्यापीठ रोज सरासरी ५७५ किलो घनकचऱ्याचे व्यवस्थापन करते. पर्यावरण संवर्धनासाठी हरित विकास हा मूलमंत्र घेऊन विद्यापीठ वाटचाल करीत असून, त्या बळावरच विद्यापीठाला हे यश मिळाले असल्याचे प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी सांगितले.निकष असेया पुरस्कारासाठीच्या प्रमुख निकषांमध्ये जल व्यवस्थापन, सौरऊर्जा वापर, ऊर्जा संवर्धन उपक्रम, हरितक्षेत्र, घनकचरा, भू-वापर आणि व्यवस्थापनाचा समावेश होता.

शिवाजी विद्यापीठाने जलसंवर्धनासह पर्यावरणपूरक संवर्धनशील हरित विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये विद्यापीठाचा अभियांत्रिकी व उद्यान विभाग देत असलेले योगदान लक्षणीय आहे. परिसराच्या स्वच्छतेसह ग्रीन प्रॅक्टिसेस राबविण्याबाबत कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी, नागरिक हे सर्वच घटक सजग आहेत. -डॉ. डी. टी. शिर्के, कुलगुरू

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठ