शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी विद्यापीठ अधिसभा सदस्यांकडून राज्यपालांचा निषेध, स्थगन प्रस्ताव नाकारल्याने केला सभात्याग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 13:01 IST

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी छत्रपती शिवाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास सांगत असल्याचा आरोप करत शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीच्या अधिसभा सदस्यांनी आज, शुक्रवारी अधिसभेच्या प्रारंभी निषेध नोंदविला.

कोल्हापूर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी छत्रपती शिवाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास सांगत असल्याचा आरोप करत शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीच्या अधिसभा सदस्यांनी आज, शुक्रवारी अधिसभेच्या प्रारंभी निषेध नोंदविला. विद्यापीठ प्रशासनाने राज्यपालांच्या निषेधाचा स्थगन प्रस्ताव नाकारल्याने सदस्यांनी सभात्याग केला.तर, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापकाबाबत दिलेला निर्णय अंमलबजावणीबाबतचा स्थगन प्रस्ताव नाकारले विद्यापीठ शिक्षक संघाच्या (सुटा) सदस्यांनीही सभात्याग केला. विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृहाबाहेर येवून विद्यापीठ प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.अधिसभा सुरू होण्यापूर्वी विकास आघाडीच्या सदस्यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर एकत्रित येवून राज्यपाल कोश्यारी यांचा निषेध केला. यावेळी अधिसभा सदस्य मधुकर पाटील यांनी छत्रपती शिवरायांचा इतिहास राज्यपाल कोश्यारी चुकीचा सांगत असल्याने आम्ही त्यांचा निषेध केला असल्याचे सांगितले. त्यानंतर उपस्थित सदस्यांनी राज्यपालांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी धैर्यशील पाटील, संजय जाधव, डी. आर. मोरे, भारती पाटील, आदी उपस्थित होते.यानंतर सभागृहात आल्यानंतर प्रताप पाटील, मधुकर पाटील, अमरसिंह रजपूत यांनी राज्यपालांच्या निषेधाचा स्थगन प्रस्ताव मांडला. प्रशासनाने तो नाकारल्याने विकास आघाडीच्या सदस्यांनी सभात्याग केला. दरम्यान, सुटा पुरस्कृत अधिसभा सदस्य डॉ. निळकंठ खंदारे यांनी मांडलेला राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या निर्णयाबाबतचा स्थगन प्रस्तावही  प्रशासनाने नाकारला. त्यावर डॉ. खंदारे यांच्यासमवेत ए.बी. पाटील, अरूण पाटील, इला जोगी, मनोज गुजर, अलका निकम या सदस्यांनी सभात्याग केला. त्यांनी प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. त्यानंतर अधिसभेत दुपारी बाराच्या सुमारास प्रश्नोत्तराचा तास सुरू झाला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी