शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO - शिवाजी विद्यापीठ अधिसभेसाठी विकास आघाडीची आघाडी, पहिला निकाल विद्यापीठ शिक्षक गटाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 16:00 IST

शिवाजी विद्यापीठ अधिसभा आणि अन्य अधिकार मंडळांवर शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीने सर्वप्रथम जाहीर झालेल्या निकालात आघाडी घेतली असून विद्यापीठ शिक्षक गटातील दोन जागा जिंकल्या आहेत. सकाळी नऊ वाजल्यापासून विद्यापीठातील परीक्षा भवन क्रमांक दोनमध्ये मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

ठळक मुद्देव्यवस्थापन, शिक्षक गट, अभ्यास मंडळांच्या जागा जिंकल्या,पहिला निकाल सकाळी अकरा वाजताच जाहीर कार्यकर्ते, समर्थकांचा जल्लोष

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ अधिसभा आणि अन्य अधिकार मंडळांवर शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीने सर्वप्रथम जाहीर झालेल्या निकालात आघाडी घेतली असून विद्यापीठ शिक्षक गटातील दोन जागा जिंकल्या आहेत. सकाळी नऊ वाजल्यापासून विद्यापीठातील परीक्षा भवन क्रमांक दोनमध्ये मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली आहे.विद्यापीठ शिक्षक गटातून विद्यापीठ विकास आघाडीचे सागर डेळेकर, भारती पाटील आणि एन. बी. गायकवाड हे विजयी झाले. शिवाजी विद्यापीठ अधिसभा निवडणुकीत शिवाजी विद्यापीठ विकास आघाडी आणि विद्यापीठ विकास मंच यांच्यात मैत्रीपूर्ण लढती झाल्या.शिक्षक गटातील मतमोजणीनंतर व्यवस्थापन गटातील मतमोजणी सुरु झाली. विविध अभ्यासमंडळांपैकी गणित (मॅथेमॅटिक्स) अभ्यासमंडळाच्या गटात शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीचे दिलिप हसबे, नवनीत सांगले हे विजयी झाले. या गटात विद्यापीठ विकास संघाचे (सुटा) हंबीरराव दिंडे विजयी झाले.

सुटाचे जनार्दन यादव आणि विकास आघाडीचे दिलीप हसबे यांना समान मते पडल्याने चिठ्ठीवर निकाल जाहीर करण्यात आला. हसबे यांना चिठ्ठीवर विजयी घोषित करण्यात आले.

व्यवस्थापन गटातून शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीचे दत्तात्रय चवरे, सारंग बोला हे विजयी झाले, तर सुटाचे रविंद्र तेली विजयी झाले.या निवडणुकीच्या रिंगणात शिवाजी विद्यापीठ विकास आघाडी, विद्यापीठ विकास मंच, आजी-माजी विद्यार्थी कृती समिती आणि विद्यापीठ शिक्षक संघाने (सुटा) आपली ताकद पणाला लावली.

शुक्रवारी (दि. १७) मोठ्या चुरशीने सरासरी ६२ टक्के मतदान झाले. गेल्या दीड महिन्यांपासून विद्यापीठ आणि महाविद्यालयांतील वातावरण हे निवडणूकमय झाले होते.नोंदणीकृत पदवीधर, प्राचार्य, प्राध्यापक, संस्थाचालक, शिक्षकेत्तर कर्मचाºयांनी आपआपल्या आघाडी अथवा युतीची अधिसभा, अन्य अधिकार मंडळांवर सत्ता आणण्यासाठी पायाला भिंगरी बांधली. या मतमोजणी प्रक्रियेत स्वत: कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर सहभागी झाले आहेत.आपल्या उमेदवारांना किती मते मिळतील, आपले आणि विरोधकांचे बलाबल हे गटनिहाय कसे राहिले याची आकडेवारी, अंदाज व्यक्त करण्यात निवडणूक लढविलेल्या आघाडी आणि युतीतील संघटनांचे पदाधिकारी, उमेदवार आणि कार्यकर्ते व्यस्त आहेत.शिवाजी विद्यापीठातील परिक्षा भवन क्रमांक दोनमध्ये मतमोजणीसाठी २५ अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत. पंधरा टेबलांवर मतमोजणी सुरु आहे. गटनिहाय मतपेट्यांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. सकाळी विद्यापीठ शिक्षक गटातील मतमोजणीने सुरुवात झाली.पहिला निकाल विद्यापीठ शिक्षक गटाचा जाहीरमतमोजणीची सुरुवात विद्यापीठ शिक्षक गटाने होणार झाली असून या गटाचा निकाल सकाळी अकराच्या सुमारास लागण्यास सुरुवात झाली. या गटात जाहीर झालेले दोन जागांचे निकाल लागले असून या दोन्ही जागा विद्यापीठ विकास आघाडीने जिंकल्या आहेत. यापाठोपाठ अभ्यास मंडळांची मतमोजणी सुरु झाली.

अधिसभा प्राचार्य, अधिसभा शिक्षक, विद्या परिषद शिक्षक, नोंदणीकृत पदवीधर गट घेतले जातील. पसंतीक्रमानुसार मतदान झाले असल्याने मतमोजणीला जादा वेळ लागणार आहे. रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया चालणार असल्याची शक्यता आहे.

टॅग्स :universityविद्यापीठElectionनिवडणूक