शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी विद्यापीठ : चुकीच्या पदवी प्रमाणपत्रांचा खर्च दोषींकडून वसूल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 19:14 IST

चुकीच्या पद्धतीने सन २०१८ मधील दीक्षान्त समारंभावेळी छापलेल्या पदवी प्रमाणपत्रांच्या आर्थिक खर्चाची जबाबदारी निश्चित करा. हा खर्च या प्रकरणी दोषी असणाऱ्यांकडून वसूल करण्याची मागणी शिवाजी विद्यापीठ अधिसभा (सिनेट) सदस्यांनी शनिवारी केली. या सभेत पदवी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून वादळी चर्चा झाली.

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठ : चुकीच्या पदवी प्रमाणपत्रांचा खर्च दोषींकडून वसूल कराशिवाजी विद्यापीठ अधिसभेत वादळी चर्चा; कर्मचारी संघाचे घोषणा आंदोलन

कोल्हापूर : चुकीच्या पद्धतीने सन २०१८ मधील दीक्षान्त समारंभावेळी छापलेल्या पदवी प्रमाणपत्रांच्या आर्थिक खर्चाची जबाबदारी निश्चित करा. हा खर्च या प्रकरणी दोषी असणाऱ्यांकडून वसूल करण्याची मागणी शिवाजी विद्यापीठ अधिसभा (सिनेट) सदस्यांनी शनिवारी केली. या सभेत पदवी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून वादळी चर्चा झाली.

कुलगुरूंनी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर सेवकांची अधिसभेवर नियुक्ती केली नसल्याच्या निषेधार्थ दुपारी दोन ते अडीच या वेळेत विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर विद्यापीठ कर्मचारी संघ घोषणा आंदोलन केले.विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृहात दुपारी बारा वाजता कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली अधिसभा बैठक सुरू झाली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के आणि सचिवपदी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर होते. बैठकीच्या प्रारंभी अधिसभा सदस्य यशवंत भालकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर कुलगुरू डॉ. शिंदे यांनी विद्यापीठाच्या कामगिरीचा आढावा सादर केला.

प्रश्नोत्तरांचा तास सुरू होत असताना विद्यापीठ शिक्षक संघाच्या (सुटा) इला जोगी यांनी काही प्रश्न मांडणे सुरू केले. त्यावर नाकारण्यात आलेले प्रश्न मांडता येणार नसल्याचे कुलगुरूंनी सांगितले. त्याला विद्यापीठ विकास आघाडीच्या सदस्यांकडून विरोध करण्यात आला. त्यानंतर प्रश्नोत्तरांचा तास सुरू झाला. त्यात मधुकर पाटील यांनी प्राचार्य, शिक्षक निवड समिती आणि विद्यार्थी कल्याण मंडळावरील सदस्यांच्या नावांची विचारणा हे प्रश्न मांडले. त्यावरून सभागृहात मतभेद झाले.

चुकीच्या पद्धतीने छापलेली किंवा खराब झालेली पदवी प्रमाणपत्रे नष्ट करण्याची काय पद्धती आहे? सन २०१८ मधील चुकीची पदवी प्रमाणपत्रे नष्ट केली का? असा प्रश्न अमरसिंग रजपूत यांनी उपस्थित केला. त्यावर प्राचार्य डॉ. धनाजी कणसे यांनी ‘पूर्वीची प्रमाणपत्रे नष्ट केली आहेत. मात्र, सन २०१८ मधील नाहीत,’ असे उत्तर दिले. त्यावर श्रीनिवास गायकवाड यांनी पदवी प्रमाणपत्रांच्या पुनर्छपाईच्या खर्चाला कोण जबाबदार, अशी विचारणा केली.

त्यावर डॉ. कणसे यांनी संबंधित प्रमाणपत्रांतील चुकांची चौकशी आणि त्याबाबतची जबाबदारी निश्चितीसाठी समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. या अहवालानंतर त्याबाबत बोलता येईल, असे सावध उत्तर डॉ. कणसे यांनी दिले. त्यानंतर प्रा. प्रताप पाटील यांनी चुकीच्या प्रमाणपत्रांच्या खर्च दोषींकडून वसूल करण्याची मागणी केली.

या प्रमाणपत्रांवरील वादळी चर्चेतच प्रश्नोत्तराचा तास संपला. त्यामध्ये अवघ्या पाच प्रश्नांवर चर्चा झाली. दरम्यान, विद्यापीठ कर्मचारी संघाने घोषणा आंदोलन करून कुलगुरू, प्रशासनाचा निषेध केला. त्यामध्ये वसंतराव मगदूम, सुनील देसाई,संतोष वंगार, रेहाना मुरसल, मनोकर कुलकर्णी, गजानन चव्हाण, अनिल पोवार, आदी सहभागी झाले. 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर