शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी विद्यापीठ : विद्यार्थी परिषदेने रोखली व्यवस्थापन परिषदेची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 17:47 IST

शिवाजी विद्यापीठाच्या ५४ व्या दिक्षांत समारंभाच्या पदवी प्रमाणपत्रांच्या दुबार छपाई गोंधळाबाबत कोणतीही कारवाई न केल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सोमवारी दुपारी शिवाजी विद्यापीठात सुरु असलेली व्यवस्थापन परिषदेची बैठक काहीकाळ रोखून धरली.

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठ : विद्यार्थी परिषदेने रोखली व्यवस्थापन परिषदेची बैठकअहवाल तीन महिन्यात, कुलसचिवांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या ५४ व्या दिक्षांत समारंभाच्या पदवी प्रमाणपत्रांच्या दुबार छपाई गोंधळाबाबत कोणतीही कारवाई न केल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सोमवारी दुपारी शिवाजी विद्यापीठात सुरु असलेली व्यवस्थापन परिषदेची बैठक काहीकाळ रोखून धरली. याबाबत समिती नेमून तीन महिन्यात अहवाल देण्याचे लेखी आश्वासन कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

शिवाजी विद्यापीठाच्या ५४ व्या दिक्षांत समारंभाच्या पदवी प्रमाणपत्रांच्या दुबार छपाई गोंधळाबाबत अभाविपने कुलगुरु आणि प्रकुलगुरुंना मार्च महिन्यात प्रत्यक्ष भेटून निवेदने दिली, पण प्रशासनाने याची दखल घेतली नाही. वारंवार पाठपुरावा करुनही प्रशासनाने वेळकाढू धोरण स्वीकारले, याबाबत विद्यार्थी परिषदेने लेखी आश्वासन मिळावे या मागणीसाठी सोमवारी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घुसून दुपारी १ वाजण्याच्या सुमारास आंदोलन केले.कार्यकर्त्यांनी बैठकीसमोरील जागेत जवळपास दोन तास ठिय्या मारुन या बैठकीत घोषणाबाजी करत आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी कुलगुरु आणि व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांना निवेदन देउन लेखी आश्वासन देण्याचा आग्रह धरला. यावेळी कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरुच होती.

या बैठकीत कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परिक्षा विभागाचे नियंत्रक डॉ. महेश काकडे, प्रकुलगुरु डॉ. शिर्के यांच्यासह व्यवस्थापन परिषदेचे सदस्य उपस्थित होते. दरम्यान, यासंदर्भात उपस्थित केलेल्या सर्व मुद्यांवर वस्तुस्थितीदर्शक अहवाल तयार करण्यासाठी कुलगुरुंच्या आदेशान्वये व्यवस्थापन परिषद सदस्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात येईल, समितीच्या बैठका त्वरित आयोजित करुन तीन महिन्यात अहवाल देण्याचे लेखी आश्वासन कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी दिले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी हे आंदोलन मागे घेतले.

या आंदोलनाचे नेतृत्व विद्यार्थी परिषदेच्या प्रदेश सहमंत्री साधना वैराळे, जिल्हा संयोजन श्रीनिवास सूर्यवंशी, ओंकार मगदूम (इचलकरंजी) तसेच गणेश जाधव, दिपांजली पिसे (सांगली) यांनी केले.

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर