शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी विद्यापीठाच्या निधीवर बोजा; हंगामी शिक्षकांच्या पगारावर ३३ कोटी खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2021 13:44 IST

रिक्त पदांच्या भरतीला शासनाची मान्यता नसल्याने आणि या शिक्षकांची विद्यापीठ भरती तासिका तत्वानुसार (सीएचबी) करीत नसल्याने स्वनिधीतून विद्यापीठाला खर्च करावा लागत आहे.

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाने गेल्या पाच वर्षामध्ये हंगामी (११ महिन्यांसाठी) तत्वावरील एकूण ११८ शिक्षकांच्या पगारावर ३३ कोटी ६० लाख रुपये इतका खर्च केला आहे. रिक्त पदांच्या भरतीला शासनाची मान्यता नसल्याने आणि या शिक्षकांची विद्यापीठ भरती तासिका तत्वानुसार (सीएचबी) करीत नसल्याने स्वनिधीतून विद्यापीठाला खर्च करावा लागत आहे.

विविध अधिविभागांसाठी शासनाकडून शिक्षकांची २५२ पदे मंजूर आहेत. त्यांपैकी १५३ पदे पूर्णवेळ कार्यरत असून उर्वरित ९९ रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन विद्यापीठाच्या संशोधन वाढीस खीळ बसत आहे. अनुदानित विभागांतील रिक्त पदांवर विद्यापीठाने २८ आणि स्वयंअर्थसाहाय्यित विभागातील रिक्त पदांवर ९० शिक्षकांची हंगामी भरती केली आहे. त्यांना दरमहा ३२ हजार रुपये पगार दिला जातो.त्यातील अनुदानित विभागातील हंगामी शिक्षकांच्या पगारावर वर्षाला एक कोटी रुपये, तर स्वयंअर्थसाहाय्यित विभागांतील शिक्षकांवर साडेपाच कोटी रुपये खर्च होत आहेत. प्रत्येक अनुदानित आणि हंगामी शिक्षक विद्यापीठामध्ये कार्यरत असूनही सुमारे १०० शिक्षकपदांचा कार्यभार शिल्लक आहे. या पदांचा कार्यभार शासनाच्या सीएचबी धोरणानुसार विद्यापीठाने दोनशेहून अधिक शिक्षकांची नेमणूक करावी. त्यामुळे विद्यापीठाचा शैक्षणिक, आर्थिक भार कमी होण्यास निश्चितपणे मदत होईल.

शिक्षकांच्या पदांची आकडेवारी

अनुदानित विभाग : ३५

शासनमान्य पदे : २५२

पूर्णवेळ कार्यरत : १२५

रिक्त : १२७

हंगामी : २८

स्वयंअर्थसाहाय्यित विभाग : २१

पूर्णवेळ कार्यरत : २८

रिक्त : १२०

हंगामी : ९०

हंगामी भरती का?

विद्यापीठातील शिक्षक सेवानिवृत्त झाल्यानंतर रिक्त होणाऱ्या पदाच्या भरतीला शासनाची मान्यता मिळत नाही. अधिविभागातून शिक्षण देण्याची गरज असल्याने विद्यापीठ हंगामी तत्त्वावर शिक्षकांची भरती विद्यापीठ प्रशासनाकडून केली जाते.

अनुदानित शिक्षकांचा शिल्लक कार्यभार शासनमान्य सीएचबी धोरणानुसार भरून विद्यापीठ फंडावरील आर्थिक बोजा कमी होण्यास निश्चित हातभार लागेल. विद्यापीठाचे बचत झालेले पैसे संशोधन, नवोपक्रम, आदींसाठी वापरावेत. - डॉ. एस. डी. डेळेकर

मुंबई, औरंगाबाद, आदी विद्यापीठांमध्ये सीएचबी धोरणानुसार शिक्षकांच्या जागा भरून वेळेचा आणि पैशांचा सदुपयोग केला जातो. त्या पद्धतीचा उपयोग शिवाजी विद्यापीठाने करणे गरजेचे आहे. विद्यापीठाला नवसंशोधन करताना निधीची कमतरता भासते. भविष्यात जागतिक स्तरावर नेत्रदीपक कामगिरी करायची असेल तर विद्यापीठाला अनावश्यक खर्चाची बचत करावी लागेल. - प्रा. मधुकर पाटील

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठTeacherशिक्षक