शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शिवाजी विद्यापीठाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 14:08 IST

Shivaji University, Education Sector, online, exam, kolhapurnews तीनवेळा लांबणीवर पडलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या अंतिम सत्र, वर्षाच्या परीक्षा मंगळवारपासून सुरू झाल्या. पहिल्या दिवशी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने एकूण १७७४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. विविध १८ विषयांच्या ९९ टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा दिली. ही परीक्षा विना तक्रार पार पडली.

ठळक मुद्दे शिवाजी विद्यापीठाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा सुरूऑनलाईन परीक्षेत तक्रार नाही

कोल्हापूर : तीनवेळा लांबणीवर पडलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या अंतिम सत्र, वर्षाच्या परीक्षा मंगळवारपासून सुरू झाल्या. पहिल्या दिवशी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने एकूण १७७४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. विविध १८ विषयांच्या ९९ टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा दिली. ही परीक्षा विना तक्रार पार पडली.कर्मचाऱ्यांचे आंदोलन, अतिवृष्टी, बी.एड्‌. सीईटी या कारणांमुळे ऑक्टोबरमध्ये विद्यापीठाकडून तीनवेळा अंतिम सत्र, वर्षाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने जाहीर केलेल्या नव्या वेळापत्रकानुसार मंगळवारपासून परीक्षा सुरू झाली.

या परीक्षेचे पहिल्या दिवशी बी. व्होक, एमबीए., बी. ए. इन ड्रेस मेकिंग, बॅचलर ऑफ इंटिरिअर डिझाईन, रूरल मॅनेजमेंट, औषध निर्माण शास्त्र, आदी १८ अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी १८०२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १७७४ जणांनी परीक्षा दिली. ऑफलाईन परीक्षा ही महाविद्यालयांमध्ये झाली. त्यात बी. व्होकसह अन्य काही अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता.

सकाळी ११ ते दुपारी १२, दुपारी १.३० ते २.३० आणि दुपारी ४.३० ते सायंकाळी पाच यावेळेत परीक्षा झाली. दरम्यान, ऑनलाईन परीक्षेबाबत तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास त्याचे निराकारण करण्यासाठी स्थापन केलेला आपत्ती निवारण कक्ष हा विद्यापीठातील संख्याशास्त्र विभागाच्या प्रयोगशाळेत कार्यान्वित झाला. त्याठिकाणी सकाळी साडेआठ ते दुपारी दीडपर्यंत तंत्रज्ञ, प्राध्यापक, कर्मचारी असे ३० जण थांबून होते.वैध कारण असेल, तरच फेरपरीक्षाया परीक्षेसाठी गैरहजर राहिलेल्या विद्यार्थ्यांचे कारण वैध असेल, तरच त्यांची फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी ऑनलाईन परीक्षेबाबत एकही तक्रार आली नाही. अंतिम सत्र, वर्षाच्या परीक्षेच्या कामात सुमारे १२५ जण कार्यरत आहेत. त्यात परीक्षा मंडळ, आयटी सेल, ऑनलाईन परीक्षा घेणारी एजन्सी, आदींचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे परीक्षा मंडळाचे प्रभारी संचालक जी. आर. पळसे यांनी सांगितले.आकडेवारी दृष्टिक्षेपात

  • ऑनलाईन परीक्षार्थी : १६९०
  • ऑफलाईन परीक्षार्थी : ८४
  • एकूण गैरहजर परीक्षार्थी : २८

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूरEducation Sectorशिक्षण क्षेत्रonlineऑनलाइनexamपरीक्षा