शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी तरुण मंडळाची शहरातून आज मिरवणूक, पारंपरिक वाद्यासह घोडे, उंट ठरणार मिरवणुकीचे आकर्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 13:08 IST

जिल्हा प्रशासनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करून मिरवणूक

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करण्यासाठी भगवे झेंडे, गडकोटांच्या प्रतिकृती, विद्युत रोशनाईने कोल्हापूर सजले आहे. कोरोना, ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव कमी होण्याबरोबरच निर्बंध शिथिल झाल्याने तरुण मंडळे, तालमी संस्था, संघटनांतर्फे आयोजित जन्मकाळ सोहळा, व्याख्याने, पोवाडे आदी विविध कार्यक्रम, उपक्रमांनी शिवजयंती उत्साहात साजरी होत आहे.शिवाजी तरुण मंडळाच्या वतीने आज, दुपारी साडेचार वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कोल्हापूर शहरातून भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांसह घोडे, उंट हेही आकर्षण असून जिल्हा प्रशासनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करून मिरवणूक काढणार असल्याची माहिती मंडळाचे सहसचिव सुरेश जरग यांनी दिली.आज, सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मकाळ साेहळा संपन्न होत आहे. मंडळाचे ज्येष्ठ संचालक चंद्रकांत साळोखे, केशवराव जाधव, ॲड. अशोकराव साळोखे, विलास बोंगाळे, तुकारामाबापू इंगवले, आनंदराव ठोंबरे यांच्या हस्ते हा सोहळा होणार आहे.दुपारी साडेचार वाजता शिवाजीपेठेतून शाहू छत्रपती, पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राजेश क्षीरसागर, खासदार संभाजीराजे, खासदार संजय मंडलीक आदींच्या हस्ते मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. मिरवणुकीबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे परवानगी मागितली आहे. ते परवानगी देतील असे वाटते, तरीही कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करून मिरवणूक काढणार असल्याचे जरग यांनी सांगितले.असा राहणार मिरवणुकीचा मार्ग शिवाजी पेठ- अर्धा शिवाजी पुतळा- बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका चौक, महाराणा प्रताप चौक, आईसाहेब महाराज पुतळा, बिंदू चौक, शिवाजी चाैक, गुजरी कॉर्नर, महाद्वार रोड, ताराबाई रोड, साकाली कॉर्नर ते शिवाजी पेठ.

मिरवणुकीचे आकर्षण पारंपरिक लेझीम, हलगी, मर्दानी खेळ, तुताऱ्या, मावळे, सजीव देखावे, चित्ररथ, बेंजो, दहा घोडी, चार उंट,दहा बैलगाड्या.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivjayantiशिवजयंती