शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
3
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
4
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
5
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
6
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
7
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
8
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
9
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
10
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
11
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
12
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
13
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
14
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
15
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
16
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
17
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
18
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
19
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
20
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

शिवजयंती मिरवणुकांना परवानगी नाही, मिरवणूक काढण्यावर शिवाजी पेठ ठाम; पन्हाळ्यावर दुचाकीला परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 11:46 IST

शिवज्योत वाहण्यासाठी २०० जणांना व शिवजयंती उत्सवासाठी ५०० जणांना परवानगी देण्यात आली आहे.

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (दि.१९) प्रभात फेरी, बाइक रॅली, मिरवणूक काढण्यावर बंदी असणार आहे. मात्र, शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळातर्फे शनिवारी परंपरेनुसार मिरवणूक काढण्यात येईल, असे मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण यांनी सांगितले. कोरोना संसर्ग कमी झालेला असल्यामुळे पेठेतील नागरिक तसेच शिवभक्त प्रशासनाचा आदेश मानण्याच्या मनस्थितीत नसल्याचे त्यांनी सांगितले.जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मंगळवारी शिवजयंती उत्सवासंदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. याअंतर्गत शिवज्योत वाहण्यासाठी २०० जणांना व शिवजयंती उत्सवासाठी ५०० जणांना परवानगी देण्यात आली आहे.कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी असला तरी अजूनही प्रतिबंधात्मक नियम लागू आहेत, गर्दीमुळे पुन्हा संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. अनेक शिवप्रेमी शिवनेरी तसेच अन्य गड-किल्ल्यांवर जाऊन किंवा शहरात १८ तारखेच्या मध्यरात्री बारा वाजता एकत्र येऊन शिवजयंती साजरी करतात.मात्र, यंदा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊ नये. मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक कार्यक्रम न घेता केबल किंवा ऑनलाइन प्रक्षेपण करावे. आरोग्यविषयक व जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करावे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून हा दिवस साजरा करावा असे, आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.शिवाजी पेठ मिरवणूक काढण्यावर ठाम दरम्यान, मंगळवारी सकाळी पोलीस अधीक्षक शैलेंद्र बलकवडे यांनी शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण, देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, माजी नगरसेवक अजित उर्फ पिंटू राऊत यांच्याशी चर्चा केली. बलकवडे यांनी कोरोनाचे संकट अद्याप असून मिरवणूक न काढता मंडळाच्या परिसरात प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले.मात्र, यावर्षी पेठेतील नागरिक तसेच शिवभक्त मिरवणूक काढण्यावर ठाम आहेत. ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत, असे सांगितले. मिरवणूक ही निघणारच आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.पन्हाळ्यावर दुचाकीला परवानगीपन्हाळ्यावर शिवजयंतीनिमित्त शिवज्योत नेणाऱ्या शिवभक्तांवर तहसीलदार व नगरपरिषद प्रशासनाने निर्बंध घातल्याचे तहसीलदार रमेश शेंडगे यांनी जाहीर केले. बुधवार पेठ ते पन्हाळा शहर हा मुख्य रस्ता गतवर्षीच्या अतिवृष्टीमुळे खचला आहे. रस्ता दुरुस्तीचे काम सुरू आहे. सुरक्षिततेच्यादृष्टीने हा रस्ता दिनांक १८ फेब्रुवारी २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून ते १९ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक व चालत जाण्याकरिता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.पर्यायी रस्ता बुधवार पेठ ते रेडेघाटी ते लता मंगेशकर बंगला ते अंधारबाव असा मार्ग सुरू असून हा मार्ग अरुंद असल्याने या मार्गावर फक्त दुचाकी वाहनांना व पायी येणाऱ्या शिवभक्तांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. शिवजयंती उत्सवानिमित्त येणाऱ्या शिवभक्तांच्या वाहनांकरिता पार्किंग सोय बुधवारपेठ येथील पन्हाळा पब्लिक स्कूल व हॉटेल पूजा ग्रीनलँड येथे करण्यात आली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivjayantiशिवजयंती