शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘शिवाजी’ची ‘फुलेवाडी’वर मात : चुरशीच्या लढतीत २-0 ने नमविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 00:32 IST

संदीप पोवार, करण चव्हाण-बंदरे, संकेत साळोखे यांच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर शिवाजी तरुण मंडळाने तुल्यबळ फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाचा २-० असा पराभव करीत अटल चषक

ठळक मुद्देअटल चषक फुटबॉल स्पर्धा

कोल्हापूर : संदीप पोवार, करण चव्हाण-बंदरे, संकेत साळोखे यांच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर शिवाजी तरुण मंडळाने तुल्यबळ फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाचा २-० असा पराभव करीत अटल चषक फुटबॉल स्पर्धेत आगेकूच सुरू ठेवली.

शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत मंगळवारी या दोन संघांत साखळी फेरीतील सामना झाला. प्रारंभापासून दोन्ही संघांनी एकमेकांच्या गोलक्षेत्रात जोरदार मुसंडी मारली. मात्र, शिवाजी तरुण मंडळाच्या खेळाडूंना यश आले. यात तिसऱ्या मिनिटाला शिवाजीकडून संदीप पोवारने मारलेल्या फ्री किकवर संकेत साळोखेने हेडद्वारे उत्कृष्ट गोलची नोंद करीत संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर फुलेवाडीकडून संकेत वेसणेकर याने मारलेला फटका पोलवरून गेला. तर मंगेश दिवसेनेही हेडद्वारे गोल करण्याचा अप्रतिम प्रयत्न केला. मात्र, हा चेंडू बाहेर गेला.

शिवाजीकडून करण चव्हाण-बंदरे याने गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला यश आले नाही. प्रतिआक्रमणात फुलेवाडीकडून अक्षय मंडलिकचा फटका शिवाजीचा गोलरक्षक निखिल खन्ना याने हवेत उंचावून बाहेर काढला. उत्तरार्धात शिवाजीकडून संदीप पोवार, करण चव्हाण बंदरे, संकेत साळोखे यांनी आघाडी वाढविण्याचा प्रयत्न केला. तर फुलेवाडीकडून बरोबरी साधण्याचा प्रयत्न झाला. फुलेवाडीच्या संकेत नितीन साळोखे याला गोल करण्याची नामी संधी आली होती. मात्र, शिवाजीचा गोलरक्षक खन्ना याने पुढे येत त्याचे गोल करण्याचे इरादे परतवून लावले. ७० व्या मिनिटास शिवाजीकडून करण चव्हाण-बंदरेने दिलेल्या पासवर संदीप पोवारने गोल करीत संघास २-० अशी आघाडी मिळवून दिली. हीच आघाडी कायम ठेवत शिवाजीने सामना जिंकला.कोल्हापुरातील शाहू स्टेडियमच्या हिरवळीवर सुरू असलेल्या अटल चषक फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी शिवाजी तरुण मंडळ व फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यात झालेल्या सामन्यातील एक क्षण.

टॅग्स :Footballफुटबॉलkolhapurकोल्हापूर