शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका बरखास्तीसाठी शिवसेनेची जोरदार निदर्शने

By admin | Updated: February 1, 2015 01:30 IST

अतिरिक्त आयुक्तांना निवेदन : राजीनाम्याची मागणी

कोल्हापूर : घोटाळे, भ्रष्टाचार आणि लाचखोरीचा उद्रेक झालेली कोल्हापूर महानगरपालिका बरखास्त करावी, या मागणीसाठी आज, शनिवारी सकाळी शिवसेनेच्यावतीने महानगरपालिकेसमोर निदर्शने करण्यात आली. या निदर्शनांत मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते. निदर्शनांनंतर अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी शिवसैनिकांसमोर जाऊन त्यांचे निवेदन स्वीकारले. सकाळी साडेअकरा वाजता सुमारे दोनशेहून अधिक शिवसैनिक शनिवार पेठेतील ‘शिवालय’ येथून मोर्चाने महानगरपालिकेसमोर गेले. मुख्य दरवाजावर त्यांना रोखण्यात आले. नंतर शिवसैनिकांनी जोरदार निदर्शने केली. ‘महापालिक ा बरखास्त करा, लाचखाऊ महापौरांवर कारवाई करा,’ अशा मागण्या घोषणांद्वारे देण्यात येत होत्या. पोलिसांनी केलेल्या विनंतीनुसार अतिरिक्त आयुक्त देसाई यांनी मोर्चासमोर जाऊन निवेदन स्वीकारले. महापौर तृप्ती माळवी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले, ही कोल्हापूरच्या स्वाभिमानास तडा देणारी घटना आहे. गेल्याच आठवड्यात विरोधी पक्षनेते यांच्या घरावर छापा टाकून पोलिसांनी मॅच बेटिंगचे मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे. त्यामुळे महानगरपालिकेस लागलेली ही कीड नष्ट करून स्वच्छ प्रशासन देण्याकरिता तातडीने महापौर व विरोधी पक्षनेते यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रज, शिवाजीराव जाधव, विजय कुलकर्णी, अमर क्षीरसागर, राहुल बंदोडे, धनाजी दळवी, जयवंत हारुगले, पद्माकर कापसे, आदींनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. (प्रतिनिधी)