शाहूवाडी तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:21 AM2021-01-21T04:21:17+5:302021-01-21T04:21:17+5:30

सरुड : शाहूवाडी तालुक्यामध्ये ४१ ग्रामपंचायतींपैकी ३० ग्रामपंचायतींवर सेना सत्तेत आल्याचा दावा माजी आमदार सत्यजित पाटील - ...

Shiv Sena's saffron on 30 gram panchayats in Shahuwadi taluka | शाहूवाडी तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा

शाहूवाडी तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा

Next

सरुड : शाहूवाडी तालुक्यामध्ये ४१ ग्रामपंचायतींपैकी ३० ग्रामपंचायतींवर सेना सत्तेत आल्याचा दावा माजी आमदार सत्यजित पाटील - सरुडकर यांनी केला आहे.

माजी आमदार सत्यजित पाटील - सरुडकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम नुकताच पार पडला. या ४१ ग्रा.पं. पैकी ३० ग्रामपंचायतींमध्ये शिवसेना सत्तेत आली आहे. २४ ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेला स्पष्ट बहुमत आहे, तर सहा ठिकाणी शिवसेना , राष्ट्रवादी काॅंग्रेस आघाडीची सत्ता आहे. या निवडणुकीत मतदारांनी शिवसेना आघाडीच्या बाजूने स्पष्ट कौल दिला असून, शाहूवाडी तालुक्यातील एकूण उमेदवारांपैकी २१० इतके सेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. तालुक्यातील केर्ले, परळेनिनाई, मानोली, आंबा, नांदगाव, गोंडोली, कांडवण, शित्तूरवारुण, सोंडोली, नेर्ले, शिरगाव, शिंपे, वाडीचरण, पाटणे, शित्तूर तर्फ मलकापूर, अनुस्कुरा, पेंडाखळे, शिराळे तर्फ मलकापूर, गजापूर-विशाळगड, पणुंद्रे, बुरंबाळ, ससेगाव, परळी, कुंभवडे, नांदारी, सोनवडे, सोनुर्ले, थेरगाव-सैदापूर, वडगाव, आदी ग्रामपंचायतींमध्ये शिवसेना सत्तेत आली आहे .

तसेच पन्हाळा तालुक्यात तिरपण, नणुंद्रे, जाफळे, तेलवे, निवडे, उंड्री, पोर्ले या ग्रामपंचायतींमध्ये शिवसेना पक्ष आघाडीच्या माध्यमातुन सत्तेमध्ये सहभागी आहे. सातवे, आरळे, आवळी या ठिकाणी सेनेच्या उमेदवारांना अपेक्षित यश मिळाले असल्याचेही पाटील यांनी या पत्रकात म्हटले आहे.

Web Title: Shiv Sena's saffron on 30 gram panchayats in Shahuwadi taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.