शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

शिवसेनेचा गोकुळवर धडक मोर्चा, आंदोलकांना गेटवरच अडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 19:19 IST

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाने (गोकुळ) पशुखाद्य दरात केलेली वाढ रद्द करावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने संघाच्या गोकुळ शिरगाव येथील कार्यालयावर धडक देण्यात आली. संभाव्य तणाव लक्षात घेऊन संघाचे अध्यक्ष रवींद्र आपटे व अन्य संचालकांनी आंदोलकांना संघाच्या गेटवरच अडविले व बंद असलेल्या गेटमधूनच चर्चा करण्यात आली. अतिरेक म्हणजे त्यांचे निवेदनही लोखंडी गेटच्या फटीतूनच स्वीकारले.

ठळक मुद्देशिवसेनेचा गोकुळवर धडक मोर्चा, आंदोलकांना गेटवरच अडविले पशुखाद्य दरात केलेली वाढ रद्द करा

कोल्हापूर/कणेरी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाने (गोकुळ) पशुखाद्य दरात केलेली वाढ रद्द करावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने संघाच्या गोकुळ शिरगाव येथील कार्यालयावर धडक देण्यात आली. संभाव्य तणाव लक्षात घेऊन संघाचे अध्यक्ष रवींद्र आपटे व अन्य संचालकांनी आंदोलकांना संघाच्या गेटवरच अडविले व बंद असलेल्या गेटमधूनच चर्चा करण्यात आली. अतिरेक म्हणजे त्यांचे निवेदनही लोखंडी गेटच्या फटीतूनच स्वीकारले.सकाळी बारा वाजता गोकुळ शिरगाव एम. आय. डी. सी. फाट्यावर शिवसैनिक एकत्र आले. व गोकुळ दूध संघाच्या विरोधात घोषणा देत गोकुळ दूध संघाच्या कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी शिवसैनिकांनी गोकुळ दूध संघाच्याच्या गेट वर जाऊन गोकुळ दूध संघाच्या विरोधात घोषणा दिल्या.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी गेली पंधरा दिवस शिवसेनेच्या वतीने दौरा चालू असताना त्यांनी लक्ष दिले नाही. गोकुळ सांग आणि दुधाची सरसकट दोन रुपये दरवाढ करावी व पशुखाद्याची शंभर रुपये वाढवले दर वाढ कमी करावी.

यावेळी संजय पवार म्हणाले शिवसेनेच्या वतीने जिल्हा पंधरा सुरू आहे सद्यस्थितीत दूध उत्पादन करण्याकरिता खर्च वाढत आहे.पण दुधाचे दर वाढत नाहीत. अनेक वेळा आंदोलन करूनही गोकुळ दूध संघाने शेतकऱ्यांच्या वर अन्याय केला आहे.

यावेळी गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांच्यासह संचालक मंडळाने गेटवर येऊन शिवसेनेचे मागणीचे निवेदन स्वीकारले. यावेळी उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शिवसेना तालुकाप्रमुख विनोद खोत, राजू यादव ,विराज पाटील, उपतालुकाप्रमुख भगवान कदम, एम टी.पाटील, अक्षय माने , विश्वनाथ वारके, शिवाजीराव जाधव, सरदार तिप्पे,अवधूत साळुंखे, अविनाश शिंदे, दिलीप सूर्यवंशी, युवराज पवार, विद्या गिरी, आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याच्या वतीने पोलिसांचा फौज फाट्यासह चोख बंदोबस्त करण्यात आला होता.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाने (गोकुळ) पशुखाद्य दरात केलेली वाढ रद्द करावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने संघाच्या गोकुळ शिरगाव येथील कार्यालयावर धडक देण्यात आली. संभाव्य तणाव लक्षात घेऊन संघाचे अध्यक्ष रवींद्र आपटे व अन्य संचालकांनी आंदोलकांना संघाच्या गेटवरच अडविले व बंद असलेल्या गेटमधूनच चर्चा करण्यात आली. अतिरेक म्हणजे त्यांचे निवेदनही लोखंडी गेटच्या फटीतूनच स्वीकारले. (छाया : राज मकानदार)

टॅग्स :Gokul Milkगोकुळkolhapurकोल्हापूर