शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात शिवसेनेला हादरा, दोन्ही खासदार शिंदे गटात गेल्याने पक्ष बांधणीचे आव्हान

By विश्वास पाटील | Updated: July 20, 2022 12:12 IST

मंडलिक-माने हे दोघेही शिंदे गटातून भाजपचे उमेदवार ठरले तर मूळच्या भाजपच्या नेत्यांना व मतदारांनाही ते कितपत रुचेल, हा प्रश्न.

विश्वास पाटीलकोल्हापूर : शिवसेनेचे कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक व हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने हे दोघेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात गेल्याने जिल्ह्यात पक्षाला मोठा हादरा बसला. हे दोघेही शिवसेनेचे मूळचे हाडाचे कार्यकर्ते नव्हते. त्यांच्या घराण्याची राजकीय वाटचाल मुख्यत: राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच झाली. शिवसेनेच्या धनुष्यबाणामुळेच त्यांना खासदारकी मिळाली परंतु एकाचवेळी दोन्ही खासदारांनी उद्धव ठाकरे यांना राम राम केल्याने ठाकरे यांच्यासमोर राज्याप्रमाणेच कोल्हापूर जिल्ह्यातही पक्षाची नव्याने बांधणी करण्याचे आव्हान असेल.शिवसेनेला या दोन्ही जागांसाठी ताकदीचे उमेदवार शोधावे लागतील ते या घडीला तरी पक्षाकडे नाहीत. पक्षाकडे आज एकही आमदार नाही. एकमेव आमदार प्रकाश आबिटकरही शिवसेनेसोबत गेले आहेत. महाविकास आघाडी म्हणून लढायचा निर्णय झाल्यास कोल्हापूरच्या जागेवर राष्ट्रवादीही दावा सांगू शकते. कारण मूळ ही जागा त्याच पक्षाची आहे. मंडलिक-माने हे दोघेही शिंदे गटातून भाजपचे उमेदवार ठरले तर मूळच्या भाजपच्या नेत्यांना व मतदारांनाही ते कितपत रुचेल, हा प्रश्न आहेच.हातकणंगले मतदार संघातून भाजपच्या उमेदवारीसाठी आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे यांनी तयारी सुरू केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टीही तिथे रिंगणात असतील. या मतदार संघातीलही शिवसेनेचे एकमेव सहयोगी आमदार व माजी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर हे शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे शिवसेनेपुढचे आव्हान या मतदार संघातही खडतर आहे. शिरोळची विधानसभा व हातकणंगलेची लोकसभा अशी काही देवघेव करून त्यांना पुढील रणनीती ठरवावी लागेल. महाविकास आघाडी होणार की शिवसेना स्वतंत्र लढणार यावर सगळ्या घडामोडी अवलंबून आहेत. तूर्त दोन्ही खासदारांनी ठाकरे यांना सोडचिठ्ठी दिल्याचा मोठा धक्का शिवसेनेला बसला आहे एवढे मात्र नक्की.मंडलिक यांचे वडील पाचवेळा राष्ट्रवादीचे खासदार होते. त्याची हयात काँग्रेस व राष्ट्रवादीत गेली. परंतु शेवटच्या २००९ च्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीशी पंगा घेऊन अपक्ष म्हणून निवडणूक जिंकली व तेव्हापासून मंडलिक गट शिवसेनेच्या सावलीत आला. संजय मंडलिक यांना शिवसेनेने दोनदा उमेदवारी दिली. पक्षात आमदारांची बंडाळी माजल्यावर मंडलिक मातोश्रीवर ठाण मांडून होते. जिल्ह्यात काढलेल्या मोर्चातही ते पुढे होते. जे सोडून गेले ते बेन्टेक्स पुढारी होते, शिल्लक राहिले ते अस्सल सोने अशी बोचरी टीकाही त्यांनी केली परंतु शेवटी आठ दिवसांत ते स्वत:च शिंदे गटात गेले.खासदार माने यांच्या मातोश्री निवेदिता माने यांनीही इचलकरंजी लोकसभा मतदार संघातून शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवून त्यांचा पराभव झाला म्हणून राष्ट्रवादीची स्थापना झाल्यावर त्यांनी लगेच राष्ट्रवादीचा झेंडा खांद्यावर घेतला. या पक्षाच्या चिन्हावर त्या दोनवेळा खासदार झाल्या. पक्षाने त्यांना राष्ट्रीय महिला अध्यक्ष केले होते. परंतु ही जागा आघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या वाट्याला गेल्यावर धैर्यशील माने हे शिवसेनेत गेले.पहिल्याच लढतीत त्यांना यश मिळाले. तेदेखील आमदार फुटीच्या काळात मातोश्रीवर होते. त्यांनीही मतदार संघातील विकासकामांचे कारण देऊनच शिंदे गटाशी सोबत केली आहे. विकासकामे की राजकीय निष्ठा यापैकी काय निवडायचे, हाच आता कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेपुढील कळीचा प्रश्न असेल. त्यावर या दोघांचे राजकीय भवितव्य निश्चित होईल

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणEknath Shindeएकनाथ शिंदे