शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

लोकसभेच्या ४८ जागा जिंकण्याचा शिवसेनेचा निर्धार, कोल्हापुरातील अधिवेशनात मोदी, शहांचे अभिनंदन

By समीर देशपांडे | Updated: February 16, 2024 15:19 IST

अधिवेशनात झालेले ठराव जाणून घ्या

कोल्हापूर : शिवसेनेच्या येथील राष्ट्रीय अधिवेशनाच्या पहिल्याच सत्रात पंतप्रधान नरेंद्र माेदी आणि अमित शाह यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. याचबरोबर महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व म्हणजे ४८ जागा महायुतीच्या माध्यमातून जिंकण्याचा निर्धारही ठरावाव्दारे व्यक्त करण्यात आला. राज्यात वैविध्यपूर्ण योजना राबवून सर्वसामान्यांना दिलासा देणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही ठरावाव्दारे अभिनंदन करण्यात आले. आज शनिवारी दुपारी शिंदे यांचे अधिवेशनात भाषण होणार असून गांधी मैदान येथे संध्याकाळी सहा वाजता सभा होणार आहे.येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये दुपारी साडेबारानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत अधिवेशनाला सुरुवात झाली. तत्पूर्वी, सकाळी ९ पासूनच संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नोंदणीसाठी गर्दी केली होती. नोंदणी झाल्यानंतर सर्वांना शिवसेनेचा मफलर, नोटपॅड देण्यात येत होते. शाहिरी पोवाड्याने अधिवेशनाची सुरुवात झाली. यानंतर शिंदे आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलवन करण्यात आले. दिवसभरामध्ये मंत्री गुलाबराव पाटील, किरण पावसकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, रामदास कदम, राजश्री पाटील यांची प्रामुख्याने भाषणे झाली. यातील गुलाबराव पाटील आणि रामदास कदम यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर टीकेचे प्रचंड आसूड ओढले. दिवसभरामध्ये संघटनान्मक, राजकीय विषय आणि सरकारी योजनांबाबत कार्यशाळा झाली.

या अधिवेशात झालेले ठराव खालीलप्रमाणे

  • भारताचे पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या १० वर्षांच्या सुवर्ण कारकिर्दीबाबत अभिनंदन.
  • देशाचे सहकार मंत्री अमित शाह यांनी सहकार क्षेत्रात केलेल्या बहुमोल कामगिरीबाबत अभिनंदन.
  • राम मंदिर प्रतिष्ठापनेबद्दल अभिनंदन.
  • लोकसभा निवडणुकीत मिशन ४८ म्हणजेच सर्व ४८ जागांवर महायुती विजयी होणे. या दृष्टीने सर्व निर्णय आणि त्याबाबतचे सर्व अधिकार मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना. कार्यकर्त्यांना तशी दिली शपथ.
  • बाळासाहेब ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना पक्षासाठी अहोरात्र कार्य केले, अशा शिवसेना नेत्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वार्षिक सात पुरस्कार देण्याचा निर्णय.

यांच्या नावे दिले जाणार पुरस्कार

  • दत्ताजी साळवी यांच्या नावे उत्कृष्ट कामगार पुरस्कार
  • सुधीर जोशी यांच्या नावे नावीन्यपूर्ण उभरता उद्योजक पुरस्कार
  • दत्ताजी नलवडे यांच्या नावे आदर्श शिवसैनिक पुरस्कार
  • प्रमोद नवलकर यांच्या नावे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार
  • वामनराव महाडिक यांच्या नावे उत्कृष्ट शिक्षण पुरस्कार
  • दादा कोंडके यांच्या नावे कला क्षेत्रातील पुरस्कार
  • शरद आचार्य यांच्या नावे सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार

चांगलीच वातावरण निर्मितीअधिवेशनस्थळी शिवसेनेने चांगलीच वातावरण निर्मिती केली. श्रीराम, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, एकनाथ शिंदे यांचे कटआऊटस उभारण्यात आले होते. प्रचंड मोठ्या सुसज्ज अशा शामियान्यामध्ये भव्य असे व्यासपीठ उभारण्यात आले होते. पत्रकारांना मात्र अधिवेशनात मज्जाव असून बाहेर मान्यवर येऊन पत्रकार परिषदा घेत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाह