शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेला उसना उमेदवार नको, कोल्हापुरातील ठाकरे गटाच्या मेळाव्यात आग्रही मागणी

By समीर देशपांडे | Updated: July 8, 2023 16:24 IST

कोल्हापूर : प्रत्येकवेळी शिवसेनेने लोकसभेला कोल्हापूर  आणि हातकणंगले मतदारसंघात उपरा आणि उसना उमेदवार दिला. सगळे जण खासदार झाले परंतू ...

कोल्हापूर : प्रत्येकवेळी शिवसेनेने लोकसभेला कोल्हापूर  आणि हातकणंगले मतदारसंघात उपरा आणि उसना उमेदवार दिला. सगळे जण खासदार झाले परंतू शिवसेनेला सोडून गेले. त्यामुळ कोणत्याही परिस्थितीत येणाऱ्या लोकसभेला उसना उमेदवार नको अशी आग्रही मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या कोल्हापूरमधील मेळाव्यात पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावरही टीका करण्यात आली. संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर यांच्या अध्यक्षतेखाली शाहू स्मारक भवनमध्ये हा मेळावा झाला. यासाठी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा प्रमुख विजय देवणे यांनी कोल्हापूरमधून तर जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली. यावेळी मुरलीधर जाधव म्हणाले, आम्ही शिवसैनिक काही मेल्या आईचं दूध प्यालेलो नाही. शिवसेना सोडल्यानंतर कोण बरोबर आहे की नाही याचा विचार न करता खासदार धैर्यशील माने आणि माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या घरावर मोर्चा काढला. १५ दिवसात माने शिवसेनेत आले आणि खासदार झाले. आता यापुढे हे चालणार नाही. विजय देवणे म्हणाले,  आम्ही संघटनेसाठी रक्ताचे पाणी करतो, पोटात अन्न नसताना शिवसैनिक रस्त्यावर उतरतो म्हणून संघटना जिवंत आहे. अशावेळी उमेदवारीला मात्र दुसऱ्याला प्राधान्य असे यावेळी तरी करू नका. यावेळी शहरप्रमुख रवि इंगवले, माजी आमदार सत्यजित पाटील, उल्हास पाटील, डॉ. सुजित मिणचेकर यांची भाषणे झाली. आपल्या सर्वांच्या भावना मला समजल्या आहेत. आपल्याला पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे हात बळकट करायचे आहेत. त्यामुळे तो देतील तो निर्णय स्वीकारून प्रत्येक जागा लढवण्यासाठीची तयारी करा असे आवाहन यावेळी दुधवडकर यांनी केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे