शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

धैर्यशिल मानेंनंतर शिवसैनिकांचा संजय मंडलिकांविरोधात एल्गार

By भीमगोंड देसाई | Updated: August 4, 2022 19:19 IST

मोर्चात बेंटेक्स दागिणे परिधान केलेली मंडलिक यांची प्रतिकात्मक प्रतिमा असणार

भीमगोंडा देसाईकोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेले खासदार संजय मंडलिक यांच्या येथील शिवाजी पार्कातील भाड्याने राहत असलेल्या घरावर सोमवारी दुपारी १२ वाजता मोर्चा काढणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय देवणे यांनी आज, गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली. शाहूपुरी जिमखाना ग्राऊंडपासून मोर्चाला सुरूवात होईल. मोर्चात मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी होतील असा दावा त्यांनी केला.ते म्हणाले, कोल्हापूरचा खासदार शिवसेनेचा व्हावा, हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. ते पूर्ण करण्यासाठी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी प्रा. संजय मंडलिक यांना शिवसेनेची उमेदवारी देवून निवडून आणले. ते ठाकरे कुटुंबांशी विश्वासू बनले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर खासदार मंडलिक मातोश्रीवर तळ ठोकून होते. माजी मंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांना शिवसेनेत आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर ठाकरे यांनी सोपवली होती. इतका विश्वास मंडलिक यांच्यावर ठाकरे यांनी टाकला होता. तरीही खासदार मंडलिक यांनी विश्वासघात करीत शिवसेना पक्षाच्या पाठीत खंजित खुपसून शिंदे यांच्यासोबत गेले.सामान्य शिवसैनिकांनी जीवाचे रान करून त्यांना निवडून दिले. माजी मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंडलिक यांनी सूचवलेल्या अनेक विकास कामांना भरीव निधी दिला. तरीही त्यांनी पक्षाशी गद्दारी केली आहे असल्याचे ते म्हणाले. यावेळी जिल्हा प्रमुख संजय पवार, शहर प्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी, हर्षल सूर्वे उपस्थित होते.बेंटेक्स दागिने...शिवसेनेत राहिले ते खरं सोनं आणि गेले ते बेंटेक्स असा आरोप करून चार दिवसांत खासदार मंडलिक हे शिंदे गटात दाखल झाले. म्हणून बेंटेक्स दागिणे परिधान केलेल्या मंडलिक यांची प्रतिकात्मक प्रतिमा मोर्चात असेल, अशी माहिती देवणे यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv Senaशिवसेना