शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

ध्वनियंत्रणेच्या दणदणाटात कोल्हापूरात संयुक्त मंगळवार पेठेची शिवजयंती मिरवणुक

By संदीप आडनाईक | Published: May 09, 2024 9:59 PM

तब्बल पाच तास मिरवणुक

कोल्हापूर: ध्वनि यंत्रणेच्या दणदणाटात गुरुवारी संयुक्त मंगळवार पेठ राजर्षी शाहू तरुण मंडळाची शिवजयंती उत्सवाची मिरवणूक पार पडली. मिरजकर तिकटीहून निघालेल्या या मिरवणुकीत आवाज वाढल्यामुळे कांही काळ पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली तर ट्रॅक्टर पुढे काढण्यावरुन पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. तब्बल पाच तास ही मिरवणुक सुरु होती.

मिरजकर तिकटी चौकातून निघालेली ही मिरवणुक बिनखांबी गणेश मंदिर, न्यू महाद्वार, पापाची तिकटी, छत्रपती शिवाजी चौक, बिंदू चौक, देवल क्लबमार्गे मिरजकर तिकटी या मार्गे निघाली. सायंकाळी श्री मालोजीराजे छत्रपती, राज्य कार्यकारी नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, उध्दवसेनेचे नेते विजय देवणे, बाबुराव चव्हाण, बाबासाहेब लबेकरी आदी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या मिरवणुकीला सुरुवात झाली. 

शेकडो युवक लेझीम आणि हलगीच्या ठेक्यात बेधुंद होऊन नाचत होते. युवकांनी शिवचरित्रावरील आधुनिक शौर्यगीतावर भगवा ध्वज हाती घेऊन ठेका धरला होता. १३ संस्थानकालीन तालीम संस्था शंभरहून अधिक तरुण मंडळांचा या मिरवणुकीत सहभाग होता. पोलिसांनी अनेकवेळा आक्षेप घेउनहीपोलिसांनी अनेकवेळा आक्षेप घेउनही या मिरवणुकीत सहभागी झालेली सर्वच मंडळांचे कार्यकर्ते आकर्षक विद्युत रोषणाईसह ध्वनियंत्रणेचा दणदणाटात नृत्य करत होते. मिरवणुकीचे आयोजन उत्सव समितीचे आर्यनिल जाधव, अनिकेत घोटणे, श्रीधर पाटील, यश कदम, विनायक पाटोळे, अक्षय देवकर, सागर गवळी, ओमकार घोटणे, गजानन यादव, निवास शिंदे,अशोक पवार, रमेश मोरे, संदीप चौगुले, सदानंद सुर्वे, जयसिंग शिंदे, बाबा पार्टे यांनी केले.

विडंबनात्मक चित्रफलकमिरवणुकीत सहभागी झालेले विडंबनात्मक, विनोदी आणि टीकात्मक चित्ररथ लक्ष वेधून घेत होता. राज्य सरकार, महापालिका आणि नागरिकांच्या नागरिकांच्या समस्यांवरील हे चित्रफलक होते. महापालिकेत खमक्या आयुक्त द्या, लग्नासाठी मुलींच्या वास्तव अपेक्षा, स्वच्छतेत शहर एक नंबर मोठा जोक, हायकोर्टासाठी कोल्हापूरकरांची फसवणूक, कोल्हापूरची ग्रामपंचायत करा, गडकोट किल्ल्यांचा चाललेला दुरुपयोग, अंबाबाई म्हणते शहराच्या बकाळ अवस्थेमुळे मलाच लाज वाटते, वाढती अतिक्रमणे, बेजबाबदार अधिकारी आणि नागरिक, अपूर्ण क्रीडा संकुल भ्रष्टाचाराचे कुरण अशा आशयाचे हे फलक होते.

टॅग्स :Shivjayantiशिवजयंतीkolhapurकोल्हापूर