शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
4
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
5
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
6
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
7
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
8
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
9
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
10
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
11
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
12
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
14
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
15
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
16
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
17
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
18
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
19
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
20
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा

शिरोळ तालुका राज्यात आदर्शवत करणार : राजेंद्र पाटील-यड्रावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 23:54 IST

तालुक्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते; मात्र शेतीमाल उद्योग सुरू होणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षांचे अभ्यासकेंद्र व उदयोन्मुख खेळांडूसाठी क्रीडासंकुल उभारणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देरोखठोक राजेंद्र पाटील-यड्रावकर तरुण, महिलांच्या हाताला काम देणार; शेती, आरोग्य, शिक्षण, उद्योग, पायाभूत सुविधांचे प्रश्न मार्गी लावणार

संदीप बावचे ।जयसिंगपूर : गेल्या पाच वर्षांत तालुक्यात विकासाच्या गप्पा झाल्या. आमदार फंडातून झालेले रस्ते व गटारी म्हणजे विकास नव्हे. तालुक्याचा रचनात्मक व सर्वसमावेशक विकास होणे गरजेचे आहे. तालुक्यात रोजगारीचा प्रश्न गंभीर आहे. त्याबाबत कोणतेही काम केलेले दिसत नाही. महिला स्वयंरोजगार याविषयी कोणतीही भूमिका घेतली नाही. तालुक्यातील शेकडो एकर शेती क्षारपडमुळे नापीक झाली आहे, त्याच्यावर कोणत्याच उपाययोजनेचे प्रयत्न झाले नाहीत. शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न गंभीर होत चालला आहे. तालुक्याला मल्टिपर्पज हॉस्पिटल आवश्यक असून, मोफत औषधोपचार मिळणे गरजेचे आहे.

तालुक्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते; मात्र शेतीमाल उद्योग सुरू होणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षांचे अभ्यासकेंद्र व उदयोन्मुख खेळांडूसाठी क्रीडासंकुल उभारणे गरजेचे आहे. महापुराने तर तालुक्याला उद्ध्वस्त केले आहे. त्यावेळी तर सरकार अपयशी ठरले आहे. लोकप्रतिनिधींना प्रशासनाला हाताळता आले नाही. त्यामुळे पूरग्रस्त नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच काही लोक कोणत्याही विकासकामांची चर्चा न करता चळवळीच्या नावावर, तर काही जातीपातीच्या नावावर मते मागत आहेत. विकासकामांवर कोण बोलणार आहे का नाही?

गेल्या ४० वर्षांपासून यड्रावकर कुटुंबीय सामाजिक व राजकीय क्षेत्रांत काम करीत आहे. त्याच्या जोरावार आज पक्षाने डावलल्यावरही तालुक्यातील जनता पाठीशी राहिली आहे. कोणावरही टीका-टिप्पणी न करता गत निवडणुकीच्या अपयशाच्या चौथ्या दिवसांपासून मी कामास सुरुवात केली आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात संपर्क ठेवून जनतेस २४ तास उपलब्ध राहिलो आहे.

तालुक्यातील प्रत्येक अडचणीत मी त्यांच्यासोबत राहून अधिकाधिक सहकार्य करण्यात पुढाकार घेतला आहे. ती सर्व जनता आज माझ्या सोबत आहे. त्यामुळेच तर मला अपक्ष लढण्याचे बळ मिळाले आहे.राजेंद्र पाटील-यड्रावकर सोशल फौंडेशनच्या माध्यमातून ६७५ रुग्णांवरती लाखो रुपये खर्चाच्या शस्त्रक्रिया व औषधोपचार, आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, सामुदायिक विवाह सोहळा, अपंग, कर्णबधिर व मूकबधिरांसाठी मदत, दुष्काळग्रस्त बांधवांना मदतीचा हात, सेवाभावी संस्था, तरुण मंडळे, गरीब-गरजू यांना नेहमी मदतीचा हात, पाणी फौंडेशनच्या कामाला श्रमदानातून बळ देण्याचे काम, तालुक्यातील तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी भव्य रोजगार मेळावा घेऊन रोजगार उपलब्ध करून दिले आहेत.सहकारी साखर कारखाना, सूतगिरणी, शिक्षण संस्था, बँक, औद्योगिक वसाहत यांच्या माध्यमातून हजारोंच्या हाताला काम, सोशल फौंडेशनातून आरोग्याची मदत करीत आहे. महापुराच्या काळात मदतीचा प्रयत्न केला आहे.

 

कोणावरही टीका करून मी निवडणूक लढवित नाही. तालुक्यातील विविध प्रश्न आणि त्याबद्दल मी काय करणार एवढेच मुद्दे घेऊन जनतेसमोर जात आहे. मी केलेल्या कामाचा आढावा घेण्यासोबत भविष्यात तालुक्यातील जनतेला सोबत घेऊन राज्यातील आदर्श तालुका करण्याचा माझा मानस आहे. तरुण, महिला बेरोजगार, शिक्षण, शेती, आरोग्य क्षारपड जमीन, महापूर असे अनेक प्रश्न तालुक्या-समोर आहेत. ते सोडविण्यावर भर देणार आहे, असे राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.महापुरात पूरग्रस्तांना मदतीचा हातमहापूर काळात शरद कॉलेजच्या ३९ बसेसच्या माध्यमातून हजारो पूरग्रस्त बांधवांना सुरक्षितस्थळी पोहोचविले. जनावरांना चारा, निवारा छावणी, जनावरांसाठी निवाऱ्याची सोय. गावागावांत पिण्याच्या पाण्याची सोय. फौंडेशनच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा, घरगुती वीज उपकरणे टीमकडून दुरुस्ती, जीवनावश्क वस्तूंची मदत, सर्व गावांमध्ये औषध फवारणी करून मदत केली. शेतकऱ्यांसाठी शरद कारखाना व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून ४०० एकर जमिनीवर क्षारपड मुक्तीसाठी पायलट प्रकल्प, शेती परिसंवाद, मार्गदर्शन शिबिर, प्रशिक्षण कार्यशाळा असे अनेक मुद्दे घेऊन मी मतदारांसमोर जात आहे.हक्काचा माणूसगेली अनेक वर्षे सामाजिक व राजकीय क्षेत्रात यड्रावकर कुटुंब कार्यरत आहे. पक्ष, गट-तट, जात-धर्म न पाहता येईल त्याचे काम करण्याचा हातखंडा असल्याने तालुक्यात हक्काचा माणूस म्हणून माझी ओळख निर्माण झाली आहे. 

तालुक्याचा विकासात्मक व रचनात्मक आराखडा करून विकास करण्याचा भर माझा राहणार आहे. तालुक्यातील प्रत्येक घटकाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठीच माझा प्रयत्न राहील. तसेच मतदारसंघातून प्रचारात मिळत असलेला प्रतिसाद पाहता जनता माझ्याबरोबर राहील, असा विश्वास यड्रावकर यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकkolhapurकोल्हापूर