शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
3
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
4
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
7
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
8
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
9
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
10
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
11
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
12
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
13
'दूरस्थ'चे दोन महिन्यांत केवळ १०,१६९ प्रवेश; कोणत्या अभ्यासक्रमांना किती प्रवेश? जाणून घ्या
14
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
15
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
16
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
17
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
18
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
19
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
20
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार

शिरोळला ‘गावठी’ जोरात

By admin | Updated: July 3, 2015 00:54 IST

कारवाईचा फार्सच : राजरोस विक्री, उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष

जयसिंगपूर : मालवणी विषारी दारूकांडाच्या घटनेनंतर शिरोळ तालुक्यात गावठी दारू हातभट्यांवर धाडी टाकल्या जात आहेत. मात्र, ही कारवाई निव्वळ फार्सच ठरत आहे. धाडी पडतात, दारूचे रसायन नष्ट केले जाते; मात्र संशयित आरोपी फरार होतात, असेच चित्र आहे. एकीकडे ही कारवाई होत असताना तालुक्यात अनेक धाबे, हॉटेलमध्ये विनापरवाना दारू विक्री राजरोसपणे सुरू आहे. याकडे उत्पादन शुल्क विभाग व स्थानिक पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.तालुक्यात जयसिंगपूर, शिरोळ व कुरुंदवाड ही तीन पोलीस ठाणी आहेत. इचलकरंजी विभागांतर्गत राज्य शासनाचा दारूबंदी व उत्पादन शुल्क विभाग कार्यरत आहे. एखाद्या घटनेनंतरच किंवा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हातभट्टी आणि गावठी दारूला आळा घालण्यासाठी कारवाईची मोहीम उत्पादन शुल्क विभाग आणि स्थानिक पोलिसांकडून राबविली जाते. मुंबईच्या मालवणी विभागात विषारी दारूचे सेवन करून शंभरपेक्षा अधिक लोकांचा बळी गेला. त्यानंतर शासनाने कारवाईचे आदेश दिल्यानंतर संबंधित विभागाकडून शिरोळ तालुक्यात गावठी दारू हातभट्ट्यांवर धाडी टाकल्या जात आहेत. दानोळी येथे तीन दारूचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. मात्र, संशयित आरोपी कारवाईवेळी फरार झाले, अशीच कारवाई दिसून आली आहे. अशी दारू तयार करणाऱ्या संबंधितांवर आजपर्यंत ठोस कारवाईच न झाल्यामुळे व यामागे अर्थकारण लपल्यामुळे कारवाईनंतर पुन्हा हे दारूअड्डे जोमाने सुरू होतात, सध्याही असेच चित्र आहे. (प्रतिनिधी)महिन्याकाठी अर्थकारणगेल्या तीन-चार वर्षांत शिरोळ तालुक्यात परमिट रूम-बीअर बारच्या संख्येत वाढ झाली आहे. तालुक्यात सुमारे ११६ परमिट रूम-बीअर बार असून, या व्यवसायिकांवर जुजबी कर वसूल करण्यात येत आहे. महिन्याकाठी अर्थकारण होत असल्यामुळे नियंत्रण ठेवणाऱ्या संबंधित विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. राजरोस विक्रीशिरोळ तालुक्यात दानोळी, शिरोळ, दानवाड परिसरात हातभट्ट्या आणि गावठी दारूचे अड्डे आहेत. गेल्या २५ ते ३० वर्षांपासून या भागात दारू बनविली जाते. प्रामुख्याने इचलकरंजी, सांगली भागात या ठिकाणाहून छुप्या मार्गाने ती विकली जाते. यामुळे उत्पादन शुल्क विभाग व स्थानिक पोलीस करतात तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.