कुरुंदवाड : शिरढोण (ता. शिरोळ) येथील गावच्या विकासाबरोबर सहकारी पाणीपुरवठा संस्थेकडून होणाऱ्या पिळवणुकीविरोधात शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा आणि गावातील रयत शिक्षण संस्थेची शाळा कधीही बंद पडू देणार नाही, असा विश्वास प्रा. चंद्रकांत मोरे व दत्त सेवा संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पा टाकवडे यांनी पत्रकार बैठकीत दिली. ते म्हणाले, दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली दत्त बहुजन विकास आघाडीची स्थापना केली आहे. गावच्या विकासाबरोबर गावातील सहकारी पाणीपुरवठा संस्थेचे नेतृत्व दस्तगीर बाणदार करत आहेत. मात्र, शेतीला वेळेवर पाणी न देणे, संस्था सभासदांच्या मृत वारसा सभासद न करणे, यामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी सक्षम फळी तयार केली जात आहे शिवाय गावातील रयत शिक्षण संस्था बंद करण्याचा व खासगी शिक्षण संस्था सुरू करण्याचा घाट घातला जात असल्याचाही आरोप त्यांनी केला.
शिरढोण "रयत"ची शाळा बंद पडू देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:23 IST