शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व जागा शिंदेसेना लढवणार, जयसिंगपूर येथे बैठकीत पदाधिकाऱ्यांचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 17:53 IST

जयसिंगपूर : शिंदेसेनेतर्फे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा जागांवर शिवसेनेचे उमेदवार लढविण्याबाबत निर्धार व सर्व उमेदवारांना ताकदीने विजयी करून मुख्यमंत्री ...

जयसिंगपूर : शिंदेसेनेतर्फे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा जागांवर शिवसेनेचे उमेदवार लढविण्याबाबत निर्धार व सर्व उमेदवारांना ताकदीने विजयी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासह इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ क्षेत्रामधून जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी विधानसभा लढवावी, अशा विविध निर्णयांनी शिंदेसेनेची बैठक संपन्न झाली.शिरोळ तालुक्यातील शिंदेसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक सोमवारी येथील जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सकाळी दहा वाजता झाली. स्वागत उपतालुकाप्रमुख संभाजी गोटे यांनी केले. यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिंदेसेनेचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्या विजयाबद्दल अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. जिल्हाप्रमुख रवींद्र माने म्हणाले की, शिरोळ विधानसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार धैर्यशील माने यांना मताधिक्य दिल्याबद्दल शिरोळ विधानसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा, नगरपालिका या निवडणुकांमध्ये सामान्य शिवसैनिकाला न्याय देण्याची प्रमुख भूमिका असेल, असे सांगितले. यानंतर पक्षबांधणीबाबत सभासद नोंदणी अभियान, गाव तेथे शाखा व घर तेथे शिवसैनिक तसेच शासकीय योजनांच्या माहितीबाबत मार्गदर्शन असे उपक्रम प्रामुख्याने राबवावेत, असे उपतालुकाप्रमुख सतीश मलमे यांनी सांगितले. तर युवा सेनेचे जिल्हाप्रमुख राकेश खोंद्रे यांनी लोकसभा निवडणुकीत युवकांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे आगामी विधानसभेत जास्तीत जास्त युवकांना संधी मिळावी. त्याची सुरूवात इचलकरंजी शहरातून करूया. इचलकरंजी मतदारसंघातून जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी केली. अनिल क्षीरसागर यांनी आभार मानले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरvidhan sabhaविधानसभाEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना