शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

शहीद चौगुले यांच्या कुटुंबीयांचे कुलगुरू शिंदे यांच्याकडून सांत्वन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 11:50 IST

उंबरवाडी (ता. गडहिंग्लज) येथील हुतात्मा जवान जोतिबा चौगुले यांच्या कुटुंबीयांची शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी बुधवारी (दि. १८) भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या कुटुंबीयांना सावरण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या शहीद स्फूर्ती केंद्राच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असा दिलासा कुलगुरू डॉ. शिंदे यांनी यावेळी दिला.

ठळक मुद्देशहीद चौगुले यांच्या कुटुंबीयांचे कुलगुरू शिंदे यांच्याकडून सांत्वनशहीद स्फूर्ती केंद्राच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य

कोल्हापूर : उंबरवाडी (ता. गडहिंग्लज) येथील हुतात्मा जवान जोतिबा चौगुले यांच्या कुटुंबीयांची शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी बुधवारी (दि. १८) भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या कुटुंबीयांना सावरण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या शहीद स्फूर्ती केंद्राच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असा दिलासा कुलगुरू डॉ. शिंदे यांनी यावेळी दिला.उंबरवाडी येथे जाऊन डॉ. देवानंद शिंदे यांनी शहीद चौगुले यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. वीरपिता गणपती चौगुले, माता वत्सला, वीरपत्नी श्रीमती यशोदा, भाऊ रजत यांच्यासह चौगुले कुटुंबीयांचे त्यांनी सांत्वन केले.कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, तीन वर्षांपूर्वी मेजर संतोष महाडिक शहीद झाले, त्यावेळी शिवाजी विद्यापीठातर्फे सातारा येथे शहीद स्फूर्ती केंद्राची स्थापना करण्यात आली. या केंद्रामार्फत शहीद जवानांच्या कुटुंबीयांना सावरण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे साहाय्य करण्यात येते.

शहिदांच्या मुलांना शालेय शिक्षण अथवा महाविद्यालयीन शिक्षणासाठी स्थानिक संस्थांशी संवाद साधून मोफत शिक्षण सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जातात. कुटुंबीयांना नोकरी उपलब्ध करून देण्यासाठीही प्रयत्न केले जातात.

या कुटुंबीयांशी एन. सी. सी. तसेच अन्य विद्यार्थ्यांचा संवाद घडवून राष्ट्रप्रेम, मूल्यविचार आणि समर्पण भावना यांचा विकास करण्यासाठी प्रेरित केले जाते. याच धर्तीवर चौगुले कुटुंबीयांनाही केंद्रामार्फत दिलासा व सहकार्य करण्यात येईल, असे कुलगुरू डॉ. शिंदे यांनी सांगितले. यावेळी विद्यापीठाच्या शहीद स्फूर्ती केंद्राचे समन्वयक डॉ. आर. व्ही. शेजवळ होते.

 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर