शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

कोल्हापुरातील शिकलगार कुटुंबाकडून ५५ वर्षे श्री गणेश पूजनाचा मान, अध्यक्षपदही मुस्लीम तरुणाकडेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 12:50 IST

कोल्हापूर : राजर्षी शाहू छत्रपतींचे सामाजिक समतेचे विचार कोल्हापूरकरांमध्ये इतके भिनलेले आहेत की, कोणी कितीही प्रयत्न केला तरी येथील ...

कोल्हापूर : राजर्षी शाहू छत्रपतींचे सामाजिक समतेचे विचार कोल्हापूरकरांमध्ये इतके भिनलेले आहेत की, कोणी कितीही प्रयत्न केला तरी येथील हिंदू आणि मुस्लीम एकत्र गुण्यागोविंदाने राहत आहेत. एवढेच नाही तर दोन्ही समाजाचे सणवार, उत्सव एकत्र साजरे केले जातात. शिवाजी पेठेतील जुना वाशीनाका येथील श्री शाहू सैनिक तरुण मंडळाचे अध्यक्ष एक मुस्लिी तरुण असून त्याच्या तीन पिढ्या मंडळाच्या गणेशोत्सवातील पूजा, आरती, प्रसाद व आतषबाजीची जबाबदारी एखाद्या व्रताप्रमाणे सांभाळत आहेत.जुना वाशीनाका येथील शिकलगार कुटुंब निम्म्या कोल्हापूरला परिचित आहे. शोभेची आतषबाजी तयार करण्याचा त्यांचा व्यवसाय असल्याने सगळ्यांच्या आनंदाच्या क्षणी हे कुटुंब सहभागी होत असते. अंबाबाईचा अष्टमीचा रथ असो, वाशीची जत्रा असो की कोणतेही धार्मिक कार्य असो शिकलगारांची आतषबाजी असतेच.शाहू सैनिक तरुण मंडळाची स्थापना १९६९ मध्ये झाली. तेंव्हा मंडळाची इमारतही नव्हती. पण गणपती उत्सव साजरा करायचे ठरल्यानंतर गणपती कुठे बसवायचा, असा प्रश्न आला तेंव्हा स्वर्गीय चॉंदसाहेब शिकलगार यांनी माझ्या दारात मंडप घालून गणपतीची प्रतिष्ठापना करू, असे सांगितले. तेंव्हापासून पुढील चार-पाच वर्षे त्यांच्याच दारात गणपतीची प्रतिष्ठापना होत राहिली. त्यांची मुलं बादशाहा, बाळासो, बाबासो, मेहबूब, सिकंदर, महंमद ही मुलं रोज गणेशाची पूजा, आरतीची जबाबदारी घेऊ लागली. मूर्तीसमोर देखावे देखील करायला लागले.पुढे मंडळाची इमारत पूर्ण झाली आणि गणपती इमारतीत बसायला लागला. परंतु पूजेचे काम शिकलगार कुटुंबाकडेच राहिले. गेले ५५ वर्षे हे व्रत त्यांनी सांभाळले आहे. स्व. चाँदसाहेब यांची नातवंडे, परतवंडे आता ही परंपरा पुढे चालवित आहेत. इब्राहिम शिकलगार हा मंडळाचा अध्यक्ष आहे तर अमित शिकलगार व अनिल आगळे रोजच्या पूजेची व्यवस्था बघतात. प्रत्येक वर्षी या कुटुंबाला पूजेचा व नैवेद्य अर्पण करण्याचा मान दिला जातो. गणपती समोर आतषबाजी या कुटुंबाकडून केली जाते. आपण मुस्लीम आहोत हे विसरून मोठ्या हिरीरीने उत्सवात भाग घेत असतात.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGanpati Festivalगणेश चतुर्थी २०२४Ganesh Mahotsavगणेशोत्सव 2024