शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
4
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
5
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
6
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
7
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
8
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
9
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
10
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
11
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
12
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
13
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
14
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
15
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
16
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
17
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
18
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
19
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
20
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

शेट्टींना ‘शिरोळ’, ‘इचलकरंजी’, तर मानेंना ‘पन्हाळा-शाहूवाडी, ‘वाळव्यात’ अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 1:13 AM

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : खासदार राजू शेट्टी गेल्या निवडणुकीत सहाही विधानसभा मतदारसंघांत मोठे मताधिक्य घेत ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : खासदार राजू शेट्टी गेल्या निवडणुकीत सहाही विधानसभा मतदारसंघांत मोठे मताधिक्य घेत विजयी झाले होते; पण आता विरोधी उमेदवाराने चांगलीच हवा केली असून, त्यांच्या दृष्टीने ‘शिरोळ’ व ‘इचलकरंजी’ मतदारसंघ घातक ठरण्याची शक्यता आहे. धैर्यशील माने यांची पहिलीच निवडणूक असली, तरी त्यांनाही पन्हाळा-शाहूवाडी व वाळव्यातील मतदारांना खेचण्याचे आव्हान राहणार आहे.हातकणंगले मतदारसंघाचे सध्याचे राजकीय बलाबल पाहिले, तर येथे शिवसेनेचे तीन आणि भाजपचे दोन असे युतीचे पाच आमदार आहेत, तर एक राष्टÑवादीचे आमदार आहेत. पुनर्रचित मतदारसंघातील २००९ ची पहिली लढत राजू शेट्टी व निवेदिता माने यांच्यात झाली होती. यामध्ये माने यांच्यावर मोठ्या मताधिक्याने विजय मिळवीत शेट्टी यांनी संसदेत प्रवेश केला. २०१४ ला राष्टÑवादीने ऐनवेळी हा मतदारसंघ कॉँग्रेसला सोडत शेट्टींना रोखण्यासाठी ज्येष्ठ नेते कल्लाप्पाण्णा आवाडे यांना रिंगणात उतरवले; पण त्यांनी आवाडे यांच्यावर तब्बल एक लाख ७७ हजार ८१० इतक्या मताधिक्याने विजय मिळविला. आता युतीचे पाच आमदार, दोन मंत्र्यांची ताकद, माने गट, तरुणांची फळी व आक्रमक वक्तृत्वशैलीने धैर्यशील माने यांनी शेट्टींसमोर आव्हान उभे केले आहे. शेट्टी यांच्यामागे राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्यासह दोन्ही कॉँग्रेसचे नेते आहेत; पण शेट्टी यांची खरी भिस्त ही शेतकऱ्यांवरच राहणार आहे. ‘शिरोळ’, ‘इचलकरंजी’तील अंतर्गत राजकारण हे त्यांच्यादृष्टीने डोकेदुखी ठरू शकते, तर माने पन्हाळा-शाहूवाडी व वाळव्यातील शेतकऱ्यांना आपलेसे करण्यात किती यशस्वी होतात यावरच जय-पराजय अवलंबून आहे.राजू शेट्टी यांची शक्तिस्थानेजयंत पाटील, प्रकाश आवाडे, गणपतराव पाटील, जयवंतराव आवळे, राजेंद्र पाटील-यड्रावकर, मानसिंगराव नाईक, सत्यजित देशमुख, मानसिंगराव गायकवाड, संजीवनीदेवी गायकवाड, जनता दलासह शेतकºयांची ताकद.धैर्यशील माने यांची शक्तिस्थानेसदाभाऊ खोत, वैभव नायकवडी, शिवाजीराव नाईक, उल्हास पाटील, माधवराव घाटगे, सुरेश हाळवणकर, सुजित मिणचेकर, सत्यजित पाटील-सरूडकर यांसह शिवसेना, भाजप, रिपाइंची सगळी रसद.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकLok Sabha Election Major Fightsलोकसभा निवडणूक टफ फाइट्सMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019