शहरं
Join us  
Trending Stories
1
Pope Francis: पोप फ्रान्सिस यांचं निधन, दीर्घ आजारपणानंतर व्हॅटिकन सिटी येथे घेतला अखेरचा श्वास
2
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
3
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
4
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
5
कितीही उत्पन्न असलं तरी श्रीमंती येणार नाही; जोपर्यंत बचतीचे 'हे' सूत्र वापरणार नाही
6
"मी लॉरेन्स बिश्नोईचा माणूस, तुला गोळी घालेन", रुबीना दिलेकच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी
7
व्यापारयुद्ध, चीन...भारतासाठी जेडी व्हेन्स यांचा दौरा महत्वाचा; पीएम मोदी कोणते मु्द्दे मांडणार?
8
Vastu Tips: घरात मनी प्लांट आहे पण आर्थिक लाभ होत नाही? नक्कीच होत आहेत 'या' चुका!
9
साईचरणी ७५ लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; कुटुंबाकडून ओळख गुप्त ठेवण्याची विनंती
10
गायीच्या शेणात असं काय खास आहे? जे खरेदी करण्यासाठी अरब देशांनी लावल्या रांगा
11
Karnataka Murder: 'आई आणि बहीण रोज वडिलांशी भांडायची, जीवे मारण्याची दिलेली धमकी'; मुलाचा मोठा दावा
12
Rishabh Pant चं नशीब फळफळलं!! आधी २७ कोटींची बोली, आता BCCIच्या करारतही मिळाली बढती
13
Vastu Tips: आपल्या वास्तूची दृष्ट कधी व कशाने काढावी? त्यामागे शास्त्र काय? जाणून घ्या!
14
Pope Francis: किती श्रीमंत होते पोप फ्रान्सिस, आपल्या मागे किती सोडली त्यांनी संपत्ती?
15
पोलिसांनी काठी मारली, दुचाकीवरील महिला तोल जावून डंपरखाली सापडली, जागीच मृत्यू   
16
बीसीसीआयनं केंद्रीय करारातून लॉर्ड शार्दुल ठाकूरचं नाव वगळलं!
17
"एका रात्रीत सर्व उद्ध्वस्त, आमच्याकडे ना दुकान आहे ना जमीन; सरकारला विनंती करतो की..."
18
ब्राह्मण असून २ लग्न का केली? अभिनेत्याचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाला- "रामाच्या वडिलांच्या ३ बायका होत्या..."
19
बाजारात ५०० रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट, थोडीशी नजरचूक पडू शकते महागात, सरकारने दिला अलर्ट 
20
Ajit Pawar: 'रिक्षात पुरुषाला बसवलं तर त्याचा फोटो काढा', अजितदादांच्या महिलांना सूचना

Kolhapur: शेतकरी संघ झाला गरीब, नेते झाले श्रीमंत; एकेकाळी आशिया खंडात होता नावलौकिक

By राजाराम लोंढे | Updated: January 6, 2025 13:38 IST

संघ राजकीय मंडळींच्या ताब्यात गेला आणि ‘बैल’ घाईला आला

एकेकाळी आशिया खंडात नावलौकिक असलेला व डोळे झाकून खरेदी करावी, असा ग्राहकांचा विश्वास मिळवलेल्या शेतकरी सहकारी संघाची अवस्था आता खूपच वाईट झाली आहे. संघ हा सहकारी संस्था असली तरी खरेदी-विक्री संस्था आहे. मार्केटिंगचा गाढा अभ्यास व दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाच्या ताब्यात संघाच्या चाव्या होत्या तोपर्यंत संघाचा ‘बैल’ धष्टपुष्ट होता. मात्र, संघ राजकीय मंडळींच्या ताब्यात गेला आणि ‘बैल’ घाईला आला. संघाची सध्याची अवस्था व आगामी काळात ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी काय करायला हवे, याचा वेध घेणारी वृत्तमालिका आजपासून..

राजाराम लोंढेकोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदा ग्राहकांना ‘मॉल’ संस्कृतीकडे आकर्षित करण्याचे काम शेतकरी सहकारी संघाने केले. संघाच्या बझारमधील कोणतीही वस्तू ग्राहक अक्षरश: डोळे झाकून खरेदी करत होते, इतका विश्वास संघावर होता. त्याला कर्मचाऱ्यांबरोबरच संघाचे विश्वस्त म्हणून काम करणाऱ्या नि:स्वार्थी नेतृत्व कारणीभूत होते.पण, अलीकडील वीस-पंचवीस वर्षांत पूर्वीच्या नेतृत्वांनी मेहनतीने समाजमनात निर्माण केलेला विश्वासाचा चिरा ढासळण्यास सुरुवात झाली आहे. संघात विश्वस्त म्हणून केलेले गब्बर झाले; पण संघ अधिकच अशक्त होत गेला. नेत्यांनी सध्याच्या विश्वस्तांचे वेळीच कान उपटले नाही तर सहकाराचे आदर्श मंदिर जमीनदोस्त होण्यास वेळ लागणार नाही.शेतकरी व ग्राहकांना माफक दरात वस्तू मिळाव्यात, त्याची फसवणूक होऊ नये यासाठी शेतकरी संघाची स्थापना करण्यात आली. स्वर्गीय तात्यासाहेब मोहिते, बाबा नेसरीकर आदी मंडळींनी अगदी साचेबद्ध कारभार करत संघाचे नाव आशिया खंडात नेले. संघाच्या नावलौकिक वाढण्यासाठी जेवढे योगदान विश्वस्तांचे होते, तेवढेच तत्कालीन कर्मचाऱ्यांचेही आहे. माल खरेदीपासून विक्रीपर्यंतची पारदर्शकता आणि विश्वासावर संघाचा डोलारा उभा होता. पण, सर्वपक्षीय अराजकीय मंडळींच्या हातून संघाच्या दोऱ्या सुटल्या आणि अधोगतीला सुरुवात झाली.

साखर कारखाना तिथे पंपशेतकरी संघ ही जिल्ह्यातील ताकदवान संस्था होती. त्यामुळे साखर कारखान्यांकडून कार्यस्थळावर पेट्रोलपंपासह शाखा सुरू करण्याचा आग्रह असायचा. एवढी मोठी गुंतवणूक व व्यवसायाची असल्याने कारखान्यांनी स्वत:ची जागा देऊन शाखा सुरू करण्यास सांगितले. संघाच्या विस्तारात हेही मुख्य कारण होते.

भरकटलेले जहाज..संघाचा कारभार दृष्ट लागण्यासारखा होता; पण १९९९ पासून संघाचे जहाज भरकटण्यास सुरुवात झाली. ते गेली २५ वर्षे किनाऱ्यावर आलेच नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी