शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शेंडा पार्क होणार कोल्हापूरचे नवीन प्रशासकीय मुख्य केंद्र, एकूण किती एकर जागा उपलब्ध.. वाचा

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: August 19, 2025 18:34 IST

२१७ एकराचा प्रस्ताव

इंदुमती गणेशकोल्हापूर : शेंडा पार्क हा कोल्हापुरातील सर्वात बहुचर्चित परिसर प्रशासकीय कार्यालयांचे मुख्य केंद्र बनणार आहे. येथे सध्या ५३७ एकर जागा उपलब्ध असून, त्यापैकी २१७ एकरातील जागांचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे आहे. प्रत्यक्षात मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, सर्किट बेंच आणि वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय या तीन महत्त्वाच्या कार्यालयांसाठी जागा हस्तांतरित झाली असून, प्रशासकीय इमारत व रुग्णालयांसाठीच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे.कोल्हापुरातील शेंडा पार्क हा परिसर भविष्यात सर्व शासकीय कार्यालयांचे प्रमुख केंद्र असणार आहे. येथील वेगवेगळ्या जमिनीच्या गटांवर महापालिका, कृषी, आरोग्य, कुष्ठरुग्णांची वसाहत आणि शासन अशा वेगवेगळ्या संस्थांची मालकी आहे. आरोग्य विभागाच्या जागेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयाचे काम सुरू आहे. सर्किट बेंचसाठी २७ एकर जागा हस्तांतरित झाली आहे. आयटी पार्कसाठीचा प्रस्ताव शासन दरबारी मान्यतेसाठी गेला आहे. 

प्रत्यक्ष जागा दिलेली कार्यालये

  • प्रशासकीय इमारत : १० एकर
  • सर्किट बेंच : २७ एकर
  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय : ३० एकर

शेंडा पार्कमधील उपलब्ध जागा हेक्टरमध्येमालकी असलेली कार्यालये : गट : क्षेत्र

  • कृषी विद्यापीठ : १३ : १४२.०३०
  • कोल्हापूर महापालिका : २ : ७.९२
  • महाराष्ट्र जीवन प्राधिकरण : १ : ०.२७
  • महाराष्ट्र कृषी भवन : १ : १.१४
  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय : १ : १२
  • शेंडा पार्क लेपर कॉलनी : १० : ३९.८०१०
  • सरकार : ३ : १२
  • एकूण : २१ : २१५.१३४०

प्रस्तावित कार्यालये

  • मालकी असलेला विभाग : कृषी (१४२ हेक्टर)
  • आयटी पार्क : ३५.७१
  • जिल्हा क्रीडा संकुल : ६.८६
  • जिल्हा ग्रंथालय : ०. ८०
  • मेट्रॉलॉजी लॅब : ०.४०
  • पब्लिक हेल्थ लॅब : ०.३०
  • प्री. एनडीए अकॅडमी : १४.७५

मालकी असलेला विभाग

  • आरोग्य (३९.८०१)
  • सर्किट बेंच : ९.१४
  • जिल्हा क्रीडा संकुल : ३.५८
  • जिल्हाधिकारी कार्यालय : ०.४२

 

  • कृषी विभागाची सरकार हक्कातील क्षेत्र (१२)
  • जिल्हाधिकारी कार्यालय : २.८०
  • वखार महामंडळ गोडावून व कार्यालय : २.००
  • समाज कल्याण वसतिगृह : २.६०
  • करवीर पोलिस ठाणे : ०.५०
  • अन्न व औषध प्रशासन : ०.१०
  • नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत : ४.००