शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ‘गोकुळ’ अध्यक्षपदाचा सर्वमान्य चेहरा शशिकांत पाटील-चुयेकर शक्य

By राजाराम लोंढे | Updated: May 19, 2025 14:21 IST

संस्थापकांचा मुलगा म्हणून नाव पुढे 

राजाराम लोंढेकोल्हापूर : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाचा सर्वमान्य चेहरा म्हणून शशिकांत पाटील-चुयेकर यांचे नाव पुढे आले आहे. ‘शशिकांत’ हे संघाचे संस्थापक आनंदराव पाटील-चुयेकर यांचे सुपुत्र आहेत. ते आमदार सतेज पाटील यांचे समर्थक असले तरी संस्थापकांच्या मुलाला संधी दिल्याने त्यांच्या नावाला कोणाचा थेट विरोध होण्याची शक्यता कमी आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निरोप आल्यानंतरच राजीनामा देऊ, अशी भूमिका अरुण डोंगळे यांनी घेतली आहे. तर, उद्या मंगळवारी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना भेटून वस्तुस्थिती सांगू व डोंगळेंसह सगळ्यांना मान्य होईल असा अध्यक्षपदाचा चेहरा ठरवल्याचेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितल्याने ‘तो’ चेहरा कोण? याविषयी उत्सुकता लागली आहे.महायुती म्हणून अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अजित नरके, नविद मुश्रीफ, प्रा. किसन चौगले यांच्या नावाची चर्चा आहे. विश्वास पाटील हे इच्छुक नाहीत, तर ‘नविद’ अध्यक्ष होणार नाही, हे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे. नरके यांच्याकडे क्षमता असली तरी ते कोठेपर्यंत नाव रेटतात, यावर बरेच अवलंबून आहे. सामान्य कार्यकर्त्याला संधी म्हणून प्रा. चौगले यांचेही नाव पुढे येऊ शकते.पण, महायुतीच्या आडून सतेज पाटील यांना एकाकी पाडण्याचा डाव, त्यातून मंत्री मुश्रीफ यांची कोंडी करण्याचा प्रयत्न आहे. मात्र, अशी कोंडी कशी फोडायची? हे मुश्रीफ यांना चांगले माहिती आहे. शशिकांत पाटील हे सतेज पाटील यांचे समर्थक असले तरी ते संस्थापकांचा मुलगा आहेत, त्यात आमदार चंद्रदीप नरके यांचे मामेभाऊ, तर संचालक अमरसिंह पाटील यांचे पाहुणे आहेत. त्यांना थेट विरोध होणार नसल्याने त्यांच्या नावावर एकमत झाल्याचे समजते.

दोन दिवसांत राजीनामा शक्यगोकुळ’शी संलग्न स्थानिक नेत्यांमधील एकजूट पाहता, अरुण डोंगळे यांनी राजीनामा दिला नाहीतर अविश्वास ठराव येणार हे निश्चित आहे. एकूण वातावरण बघता, दोन दिवसांत डोंगळे यांचा राजीनामा होण्याची दाट शक्यता आहे.

चौगलेंना पुन्हा संधी?सतेज पाटील यांनी आपल्या समर्थक संचालकांना पाच वर्षेच संधी म्हणून सांगितले हाेते. मात्र, बाबासाहेब चौगले यांची अध्यक्षपदाची संधी हुकणार असल्याने त्यांना आणखी टर्म देऊन त्यामध्ये अध्यक्ष केले जाऊ शकते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGokul MilkगोकुळPoliticsराजकारण