शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

Bharat Jodo Yatra: कोल्हापूरच्या शर्वरीची राहूल गांधींसमवेत स्वप्नवत भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 18:59 IST

भेट आणि गप्पांनी भारावलेल्या शर्वरीसाठी हा पाच मिनिटांचा प्रवास आयुष्यभरासाठीची आठवण आणि ऊर्जा देऊन गेला.

कोल्हापूर : तुम्ही कोठून आला आहात, काय करता, तुम्ही कोणकोणत्या फ्लेवरचे आईस्क्रीम बनवता अशी आस्थेने विचारपूस करत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कोल्हापूरच्या शर्वरी माणगावे हिला मी कोल्हापुरात आलो तर तुझ्याकडे आईस्क्रीम खायला नक्की येईन, असा शब्द मंगळवारी दिला. त्यांची भेट आणि गप्पांनी भारावलेल्या शर्वरीसाठी हा पाच मिनिटांचा प्रवास आयुष्यभरासाठीची आठवण आणि ऊर्जा देऊन गेला.राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सोमवारी महाराष्ट्रात पोहोचली. मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता पदयात्रेला सुरुवात झाली. त्यांच्या भोवती ५०० मीटर अंतरापर्यंत कोणीही नसतं; पण शर्वरीला काही करून त्यांना भेटायचंच होतं. तिने २-३ वेळा राहुल गांधींना हाक मारली. तिसरी हाक ऐकून त्यांनी तिच्याकडे बघितले. तिने मुझे आपको मिलना है... असे सांगितले. त्यांनी आत बोलावले आणि तिच्या हातात हात घालून चालू लागले. तिची आस्थेने चौकशी केली.शर्वरीने मी कोल्हापूरची आहे. टेम्पोवर रोलिंग स्टोनवर आईस्क्रीम बनवत असल्याचे सांगितले. राहुल यांनी टेम्पो तुम्ही स्वत: चालवता का, कोणकोणत्या फ्लेवरचे आईस्क्रीम बनवता याची माहिती घेऊन फोटो पाहिले. सामान्य कुटुंबातील मुलगी स्वेच्छेने भारत जोडो यात्रेत सहभागी होते, शिक्षण घेत हिमतीवर व्यवसाय चालवते याबद्दल तिचे कौतुक केले. आईस्क्रीमचा ब्रॅंड मोठं करा, मी कोल्हापूरला आलो की तुमच्याकडे आईस्क्रीम नक्की खाईन असा शब्दच त्यांनी दिला. हा प्रवास शर्वरीसाठी ऊर्जा देणारा ठरला.नवा आशावाद...शर्वरी सांगते, मी काही काँग्रेसची कार्यकर्ती नाही. आपल्या विचारांची, एक चांगली व्यक्ती म्हणून मला राहुल गांधींना भेटायची, पदयात्रेचा अनुभव घेण्याची इच्छा होती. पहिल्या दिवशी १० किलोमीटर चालले. मंगळवारी सकाळी ९ वाजता मी त्यांना भेटले. एवढा मोठा नेता असूनही त्यांच्यातील साधेपणा भावला. म्हणूनच कदाचित भारत जोडो यात्रेत कार्यकर्त्यांपेक्षाही सर्वसामान्यांचा सहभाग जास्त आहे. लोकांना त्यांच्या नेतृत्वात नवा आशावाद दिसत असल्याचा अनुभव यात्रेत आला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधी