शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

भागभांडवल लाखाचे अन् देणगी दिली तीन कोटींची; कोल्हापुरातील कंपनीकडून निवडणूक रोख्यांची खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2024 12:05 IST

कोल्हापूर : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर निवडणूक रोखे खरेदी प्रकरण चव्हाट्यावर आले असून, त्याच्याशी कोल्हापूर कनेक्शनही ...

कोल्हापूर : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर निवडणूक रोखे खरेदी प्रकरण चव्हाट्यावर आले असून, त्याच्याशी कोल्हापूर कनेक्शनही उघड झाले आहे. कोल्हापुरातील एका अवघे एक लाख मंजूर भागभांडवल असलेल्या स्थापत्य कंपनीने तब्बल ३ कोटी रुपयांचे रोखे खरेदी केल्याचे व ते भाजपला दिल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ही कंपनी चांगलीच चर्चेत आली आहे.नॉन मेटॅलिक मिनरल प्रॉडक्टसची उलाढाल करणारी या कंपनीची स्थापना २८ ऑक्टोबर २०२० ची आहे. या कंपनीने लगेच दोन वर्षांच्या उलाढालीनंतर नोव्हेंबर २०२३ मध्ये तीन कोटींचे रोखे खरेदी केले आहेत. या कंपनीचे कार्यालय शाहू मिलजवळ एका फ्लॅटमध्ये आहे. कंपनीचे मालक मूळचे गगनबावडा तालुक्यातील आहेत. ते इंजिनीयर आहेत. कोल्हापूर-गगनबावडा रोडवर त्यांनी अलीकडेच बंगला बांधला आहे. परंतु स्थानिक पातळीवर त्यांचा फारसा संपर्क नाही. कोल्हापुरात जिल्हा परिषदेची कामेही ते करत असल्याचे समजते. परंतु आता ते कोकणासह राज्यभरात मुख्यत: जलसंपदाची मोठ्या तलावांची कामे घेत असल्याची माहिती आहे. राज्य सरकारमधील एका वजनदार दादा मंत्र्यांशी त्यांचे निकटचे संबंध आहेत. या कंपनीमध्ये मालकासह कुटुंबातील दोन महिला संचालक आहेत. केंद्र शासनाच्या कार्पोरेट अफेअर्स मंत्रालयाच्या वेबसाइटवर कंपनीची त्रोटक माहिती उपलब्ध आहे. सत्तेतील पक्षाकडून कोट्यवधी रुपयांची कामे मिळवायची व त्याबदल्यात त्यांना वेगळ्या मार्गाने आर्थिक मदत करायची असा हा व्यवहार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरelectoral bondsइलेक्टोरल बॉन्ड