शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

शारदीय नवरात्रोत्सव: सातव्या माळेला अंबाबाईची शाकंभरी देवीच्या रुपात पूजा; देवीच्या दर्शनासाठी अलोट गर्दी

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: October 2, 2022 21:15 IST

अंबाबाईचा नवरात्रोत्सव आता सांगतेच्या दिशेने सुरू आहे. त्यानिमित्त देवी शाकंभरीच्या रुपात सजली. स्कंदपुराण, सप्तशती, देवी भागवत, करवीर महात्म्य या ग्रंथात देवीचा उल्लेख येतो.

कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या सातव्या माळेला (रविवारी) कोल्हापुरातील श्री अंबाबाई देवीची कर्नाटकातील बदामी येथील श्री शाकंभरी देवीच्या रुपात पूजा बांधण्यात आली. रविवार सुटीचा दिवस असल्याने देशभरातील भाविकांनी मोठी गर्दी करत देवीचे दर्शन घेतले. सोमवारी अष्टमीची नगरप्रदक्षिणा असून, अंबाबाई नगरवासीयांना आशीर्वाद देण्यासाठी फुलांनी सजलेल्या वाहनातून येते. हा अलौकिक सोहळा अनुभवण्यासाठी अलोट गर्दी होते.

नवरात्रोत्सवाची सातवी माळ -अंबाबाईचा नवरात्रोत्सव आता सांगतेच्या दिशेने सुरू आहे. त्यानिमित्त देवी शाकंभरीच्या रुपात सजली. स्कंदपुराण, सप्तशती, देवी भागवत, करवीर महात्म्य या ग्रंथात देवीचा उल्लेख येतो. गुहारण्य हे बदामीतील तिलकवन आहे. शाकंभरी देवी या पवित्र वनात वास करते, त्यामुळे तिला बनशंकरी किंवा वनशंकरी म्हणतात. काशीतून बाहेर पडलेले अगस्त्य ऋषी विंध्याला नमवून दक्षिणकाशी करवीर या तीर्थक्षेत्रात पत्नी लोपामुद्रेसह आले. तेव्हा करवीर निवासिनी श्री अंबाबाईने त्यांना येथे फक्त सहा महिने राहण्याची परवानगी दिली, त्यानंतर बनशंकरी येथे जाऊन तिची उपासना करावी, असा आदेश दिला. त्याप्रमाणे अगस्त्य ऋषी हे या दोन्ही क्षेत्रातील पौराणिक दुवा आहेत. शाकंभरीने अवर्षण व जलाभावामुळेमरणोन्मुख झालेल्या समस्त लोकांचे स्वत:च्या दिव्यशक्तीने स्वत:च्या देहापासून बनलेल्या शाकपत्रांनी भरणपोषण करून त्यांच्या प्राणाचे रक्षण केले. त्यामुळेच देवीचे नाव शाकंभरी असे प्रसिद्ध झाले. हा या पूजेमागील पौराणिक संदर्भ आहे. ही पूजा गजानन मुनीश्वर, रामकृष्ण मुनीश्वर, मुकूल मुनीश्वर व श्रीनिवास जोशी यांनी बांधली.

आज सोमवारी अष्टमीनिमित्त अंबाबाई मंदिरात मध्यरात्री जागराचा होम असतो. तत्पूर्वी अंबाबाईची उत्सवमूर्ती सजवलेल्या वाहनातून नगरप्रदक्षिणेला निघते. रात्री साडेनऊ वाजता तोफेच्या सलामीने नगरप्रदक्षिणा सुरू होते. रात्री उशिरापर्यंत जागराचा होम होतो, त्यामुळे खंडेवनमीला मंदिर उशिरा उघडते..