शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
Daily Top 2Weekly Top 5

इनकमिंग वाढलं, पण 'फिल्टर' लावणार; शरद पवारांनी सांगितला इतर पक्षाच्या नेत्यांना घेण्यासाठीचा निकष!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 13:53 IST

कागलमध्ये समरजीतसिंह घाटगे यांनी तुतारी हाती घेतल्यानंतर आता आणखी काही नेतेही शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचं बोललं जातं.

Kolhapur Sharad Pawar ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. महायुतीच्या जागावाटपात तिकीट मिळण्याची शक्यता धूसर असलेले नेते पवारांच्या आश्रयाला जात असल्याचं चित्र आहे. कागलमध्ये समरजीतसिंह घाटगे यांनी तुतारी हाती घेतल्यानंतर आता आणखी काही नेतेही पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचं बोललं जातं. या पार्श्वभूमीवर तुम्ही पक्षात येणाऱ्यांसाठी काही निकष ठेवला आहे का, असा प्रश्न आज कोल्हापुरातील पत्रकार परिषदेच्या दरम्यान शरद पवार यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

"एखाद्या व्यक्तीला पक्षात घेताना आम्ही विचार करतोय की, त्या व्यक्तीचं त्याच्या परिसरात काम कसं आहे, तसंच त्या भागातील आमच्यासोबत प्रामाणिकपणे राहिलेल्या लोकांचं काय मत आहे, सामाजिक-राजकीय जीवनात त्याचं चारित्र्य कसं आहे आणि त्या व्यक्तीची उपयुक्तता किती आहे, हे तपासून त्याचं स्वागत करायचं की नाही, हे आम्ही ठरवतो," अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली आहे.

दरम्यान, आणखी किती नेते टार्गेटवर आहेत, असा प्रश्नही यावेळी शरद पवार यांना विचारण्यात आला. त्यावर पवार यांनी लगेच आपले पत्ते खुले करण्यास नकार दिल्याचं पाहायला मिळालं.

मुख्यमंत्रि‍पदाच्या चेहऱ्याबाबत काय निर्णय झाला?

मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा निवडणुकीपूर्वी जाहीर करण्याच्या उद्धव ठाकरे यांच्या मागणीबद्दल बोलताना शरद पवार म्हणाले की, "मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत आताच आग्रह धरण्यात काही अर्थ नाही. मुख्यमंत्रिपदाबाबतीत महाविकास आघाडी एकत्र बसून निर्णय घेईल. आकड्यांच्या आधारावर विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचा कोण मुख्यमंत्री होणार हे ठरणार आहे. मुख्यमंत्री कोण? हे आता महत्त्वाचं नाही. सध्या महाविकास आघाडीला बहुमत मिळेल अशी स्थिती आहे. तसे वातावरण राज्यात आहे.  लोकांच्या पाठिंब्यानंतर एक स्थिर सरकार देणं महत्त्वाचं आहे. स्थिर सरकार देणं, हे आमचे उद्दिष्ट्य आहे", असं पवार यांनी स्पष्ट केलं. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारkolhapurकोल्हापूर