लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे गुरुवारी रात्री गोव्याहून कोल्हापुरात आगमन झाले. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांचे स्वागत केले.
जिल्हा परिषदेच्या आवारातील यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे अनावरण पवार यांच्याहस्ते शुक्रवारी सकाळी १० वाजता करण्यात येणार आहे. तसेच चौथ्या मजल्याच्या कामाचा प्रारंभ करण्यात येणार आहे. यानंतर पोलीस मैदानावर कार्यक्रम होणार आहे. दुपारी २ नंतर पवार शिराळा (जि. सांगली)कडे प्रयाण करणार असून रात्री पुन्हा मुक्कामाला कोल्हापुरात येणार आहेत. शनिवारी सकाळी ९ वाजता ते बेळगावकडे रवाना होतील.
या जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मंत्री हसन मुश्रीफ, बाळासाहेब पाटील, पालकमंत्री सतेज पाटील, मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर उपस्थित राहणार आहेत. मुश्रीफ यांनी गुरुवारी सायंकाळी कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन तयारीचा आढावा घेतला. यावेळी अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्यासह सभापती व अधिकारी उपस्थित होते.