शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

दिवस शनीचा.. गर्वाला दूर करण्याचा..पापक्षालनाचा!

By admin | Updated: July 25, 2014 22:13 IST

शनी अमावस्या शनिवारी

सातारा : ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ मानल्या जाणाऱ्या अनेक योगांपैकी एक असणारी शनी अमावस्या शनिवारी येत आहे. शनी-मारुतीच्या दर्शनाला या निमित्ताने गर्दी होईल. मात्र, पुराणकथांना आधुनिक संदर्भात पाहिल्यास हा दिवस पापक्षालन आणि गर्व दूर करण्याचा आहे, हे दर्शन घेणाऱ्यांनी लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. शनीची मंंदिरे गावोगावी दिसत असली, तरी शनी आणि मारुतीची मंदिरे ठराविक गावांमध्येच आढळून येतात. साताऱ्यात अशी तीन मंदिरे आहेत. मारुती हा रुद्राचा म्हणजेच शंकराचा अवतार मानला गेला आहे. रावणाने नऊ ग्रहांना पायाखाली ठेवले, तेव्हा शनीची दृष्टी रावणावर पडली. रावणाला ताकदीचा गर्व झाला होता. मात्र, शनीची दृष्टी पडताच त्याचे ग्रह फिरले आणि विनाश सुरू झाला. शनिमाहात्म्यात सर्वच कथा गर्वहरणाच्या आहेत. शनी कुणाला गर्व होऊ देत नाही आणि झालाच तर त्याचं गर्वहरण करतो, असंं मानलं जातं. त्यावरूनच ‘साडेसाती’ ही संकल्पनाही रूढ झाली. या काळात शनी संबंधिताला एक ‘दान’ देतो आणि त्याचा विनियोग करताना गर्व होतोय का हे पाहून गर्वहरण करतो, असं मानतात. काही जण साडेसाती हा केलेल्या पापांबद्दल शिक्षा भोगण्याचा काळ मानतात. शनी हा शिक्षा देणारा देव असल्यामुळं त्याची दृष्टी टाळण्याकडेच लोकांचा कल असतो. शनीचं दर्शनही समोरून कुणी घेत नाही, तर एका बाजूनं घेतात. त्याची दृष्टी आपल्यावर पडू नये, हाच यामागचा उद्देश. परंतु कथांचा सारांश लक्षात घेता आधुनिक काळात गर्व करू नये हे सांगणारं हे प्रतीक आहे आणि त्याची आठवण ठेवण्याचा दिवस म्हणून शनी अमावस्येकडे पाहायला हरकत नाही. (प्रतिनिधी)शनी-मारुती एकत्र का?शनी इतरांचं गर्वहरण करीत असला, तरी त्यालाही आपल्या शक्तीचा एकदा गर्व झाला. त्यानं थेट शंकरालाच त्रास दिला. रुद्राचा म्हणजे शंकराचाच अवतार असणाऱ्या मारुतीनं त्यावेळी शनीला काही काळासाठी आपल्या पायाखाली घेतलं, अशी कथा सांगितली जाते. किंबहुना शनी स्वत:च परिहार म्हणून मारुतीच्या पायाशी गेला. अर्थात नंतर मारुतीही शनीला शरण आला हे सांगून कथा सांगणाऱ्यांनी शनीचं श्रेष्ठत्व अबाधित ठेवलंय आणि गर्व करू नका असा संदेश दिलाय. कथांमध्ये रमण्यापेक्षा संदेश घेणंच श्रेयस्कर नव्हे का?