शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

शैलेश बलकवडे, डी. टी. शिर्के यांच्या हस्ते  लोकमत-दीपोत्सवचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 16:11 IST

diwali, kolhapurnews, lokmatevent वाचकांसाठी नव्या अनुभवांचे दार उघडणाऱ्या लोकमतच्या दीपोत्सव या दिवाळी अंकाचे प्रकाशन जिल्हा पोलीस अधीक्षक बलकवडे आणि कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते लोकमतच्या कोल्हापूर शहर कार्यालयात झाले.

ठळक मुद्देशैलेश बलकवडे, डी. टी. शिर्के यांच्या हस्ते  लोकमत-दीपोत्सवचे प्रकाशनव्यवस्थेतील सुधारणेसाठी माध्यमांनी कान टोचणे आवश्यक

 कोल्हापूर : कोणत्याही व्यवस्थेतील सुधारणेसाठी प्रसारमाध्यमांनी कान टोचणे आवश्यक आहे. ती भूमिका बजाविण्यात ह्यलोकमतह्ण अग्रस्थानी आहे. प्रशासन, शिक्षण, आदी विविध क्षेत्रांमध्ये विधायक दिशा देण्याचे काम करणारा ह्यलोकमतह्ण आमच्यासाठी अविभाज्य घटक बनला आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी गुरूवारी येथे केले.वाचकांसाठी नव्या अनुभवांचे दार उघडणाऱ्या लोकमतच्या दीपोत्सव या दिवाळी अंकाचे प्रकाशन जिल्हा पोलीस अधीक्षक बलकवडे आणि कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते लोकमतच्या शहर कार्यालयात झाले. लोकमतचे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकंरद देशमुख यांनी स्वागत केले. संपादक वसंत भोसले यांनी प्रास्ताविक केले. समाजाचे प्रश्न, समस्या समजून घेवून ते सोडविण्याची लोकमतची भूमिका आहे. जे चांगले आहे. त्यास बळ देणे आणि चुकीचे घडत असेल, तर प्रहार करणे ही लोकमतच्या पत्रकारितेची दिशा असल्याचे संपादक भोसले यांनी सांगितले.जिल्हा पोलीस अधीक्षक बलकवडे म्हणाले, पोलीस हा समाजाचा घटक आहे. पोलीस विभागाची प्रतिमा मलीन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्याच्यादृष्टीने नियोजन करण्यात येईल. विविध स्वरूपातील कारवाईबाबत समाजाच्या जशा पोलीसांकडून अपेक्षा आहेत. तसाच समाजानेही कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे.शिवाजी विद्यापीठाचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी ह्यलोकमतह्णने बळ दिले आहे. कुलगुरूपदाच्या जबाबदारीचे जाणीवही करून दिली. कोल्हापूरचे पहिले कुलगुरू होण्याचा मान मिळाल्याने माझी जबाबदारी वाढली आहे. कोल्हापूरला साजेशे काम करीन, अशी ग्वाही कुलगुरू डॉ. शिर्के यांनी दिली. यावेळी ह्यलोकमतह्णचे जाहिरात व्यवस्थापक विवेक चौगुले, मनुष्यबळ व प्रशासन विभागाचे व्यवस्थापक संतोष साखरे, मुख्य बातमीदार विश्र्वास पाटील उपस्थित होते.आशय संपन्न लोकमत-दीपोत्सवआशय संपन्न असणारा लोकमत-दीपोत्सव हा दिवाळी अंकांमध्ये अव्वलस्थानी आहे. संपादन, मांडणी, गुणवत्ता उच्च प्रतीची, तर छायाचित्रे बोलकी आहेत. त्यामध्ये विविध विषयांची मांडणी केली आहे. लोकमत-दीपोत्सव दरवर्षी एक वेगळा, नवा अनुभव देत असल्याचे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सांगितले. 

टॅग्स :Diwaliदिवाळीkolhapurकोल्हापूरlokmat deepotsavलोकमत दीपोत्सव