शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

शाहू सडोली, शाहू विद्यानिकेतनला अजिंक्यपद

By admin | Updated: November 17, 2015 01:01 IST

कुमार गट जिल्हा अजिंक्यपद, निवड चाचणी कबड्डी स्पर्धा

इचलकरंजी : येथील जयहिंद मंडळाच्या क्रीडांगणावर पार पडलेल्या कुमार गट जिल्हा अजिंंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत मुलांच्या गटात शाहू सडोली संघाने, तर मुलींच्या गटात राजर्षी छत्रपती शाहू विद्यानिकेतन संघाने अजिंंक्यपद पटकाविले.कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आणि जयहिंद मंडळाच्यावतीने दोन दिवस कुमार गट (मुले-मुली) जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा पार पडली. कै. मल्हारराव बावचकर क्रीडानगरीत खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील तब्बल ६० संघ सहभागी झाले होते. बाद पद्धतीने झालेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात शाहू सडोली, जय हनुमान बाचणी, छावा शिरोली व राष्ट्रसेवक तळसंदे या संघांनी दमदार कामगिरी करीत उपांत्य फेरी गाठली.मुलींच्या गटात डायनॅमिक स्पोर्टस्, जयहिंद मंडळ, राजर्षी छत्रपती शाहू विद्यानिकेतन व महालक्ष्मी कोल्हापूर या संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. मुलांच्या गटात शाहू सडोली विरुद्ध जय हनुमान यांच्यात झालेल्या उपांत्य लढतीत शाहू सडोलीने ३४ गुण मिळवत जय हनुमान (११) संघाचा २३ गुणांनी पराभव केला, तर छावा (२२) विरुद्ध राष्ट्रसेवक (१८) यांच्यातील रंगतदार लढतीत छावाने ४ गुणांनी विजय मिळवित अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत मुलांच्या गटात शाहू विरुद्ध छावा यांच्यात रंगतदार सामना होऊन शाहूने २८ गुण मिळवून छावा (१०) संघावर १८ गुणांनी विजय प्राप्त करून अजिंक्यपद मिळविले. मुलींच्या गटात डायनॅमिक स्पोर्टस् (२४) विरुद्ध जयहिंद मंडळ (१८) यांच्यातील लढत डायनॅमिकने ६ गुणांनी आणि रा. शाहू विद्यानिकेतन (३४) विरुद्ध महालक्ष्मी (२८) यांच्यातील लढत विद्यानिकेतनने जिंकून अंतिम फेरी गाठली.अंतिम फेरीत डायनॅमिक विरुद्ध रा. शाहू विद्यानिकेतन यांच्यातील लढतीत विद्यानिकेतनने ३१ आणि डायनॅमिकने २२ गुण मिळवले. ९ गुणांसह विद्यानिकेतनचा संघ अंतिम विजेता ठरला. स्पर्धेनंतर विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. यावेळी आमदार सुरेश हाळवणकर, दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, मंडळाचे अध्यक्ष सतीश डाळ्या, उपाध्यक्ष बजरंग वडिंगे, कार्यवाह उदय चव्हाण, नगरसेवक अजित जाधव, तानाजी पोवार, मदन झोरे, बाळासाहेब कलागते, शिक्षण मंडळ सभापती राजू हणबर यांच्यासह पदाधिकारी व खेळाडू उपस्थित होते. (वार्ताहर)