शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: शाहू वैद्यकीय नगरी विद्यार्थ्यांसाठी सज्ज, मंत्री मुश्रीफ यांनी केली पाहणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 16:25 IST

लवकरच शाहू पुतळा उभारणार; शाहू वैद्यकीय नगरीची सुचना‘लोकमत’ची

कोल्हापूर : शेंडा पार्क येथील राजर्षि छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील २९ एकरात शाहू वैद्यकीय नगरी उभारण्याचे काम सुरू आहे. यातील पूर्ण झालेल्या इमारती सोमवारी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आल्या. यामध्ये मुलींचे वसतीगृह, शवविच्छेदन गृह इमारत, व्याख्यान कक्ष व परीक्षा कक्षाचा समावेश आहे. ही वैद्यकीय नगरी विद्यार्थ्यांसाठी आता सज्ज झाली आहे, असे मनाेगत मुश्रीफ यांनी यावेळी व्यक्त केले.या इमारत प्रवेशावेळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे, कार्यकारी अभियंता रोहित तोंदले यांच्यासह महाविद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. मुश्रीफ म्हणाले, मागील कार्यकाळात वैद्यकीय शिक्षण विभागाची जबाबदारी माझ्यावर होती. ही कामे मंजूर झाली, तेव्हा या परिसरात अत्यंत दुरवस्था होती. मात्र, आज हा परिसर अतिशय चकाचक झाला आहे. येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची चांगली सोय करण्याचा प्रयत्न वैद्यकीय शिक्षण विभागाने या ठिकाणी केला आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा या ठिकाणी उभारला जाणार आहे. मुश्रीफ यांनी यावेळी मुलींच्या अद्ययावत वसतीगृहातील खोल्यांची पाहणी केली. तेथील कार्यालय, तसेच इतर सुविधा पाहिल्या. शवविच्छेदन गृहातील विविध सोयी सुविधांबाबतही त्यांनी माहिती घेतली.

या परिसरामध्ये सर्व रस्ते हे काँक्रीटचे करण्यात आलेले आहेत. मुलांना अभ्यास करण्याकरिता चांगले वातावरण राहावे, याकरिता लँडस्केपिंग आहे. प्रशस्त भव्य प्रवेशद्वार व वाहनतळ, खुले सभागृह, खुली व्यायामशाळाही उभारण्यात येणार आहे. या परिसरात २५० खाटांच्या कॅन्सर हॉस्पिटल, २५० खाटांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व ६०० खाटांच्या सामान्य रुग्णालय इमारतीचे बांधकाम अशा ५६७ कोटी रुपयांच्या कामाचे नुकतेच भूमिपूजन झाले आहे.

शाहू वैद्यकीय नगरीची सुचना‘लोकमत’चीकुष्ठ रुग्णांसाठी शेंडा पार्कची जागा राखीव ठेवणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांचे नाव या परिसरातला द्यावे. या परिसराचे ‘शाहू महाराज वैद्यकीय नगरी’ असे नामकरण करावे, अशी सूचना ‘लोकमत’ने केली होती. ती तातडीने मुश्रीफ यांनी मान्य केली. इतकेच नव्हे तर यापुढे जात त्यांनी या परिसरात शाहू महाराजांचा भव्य पुतळाही उभारण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhospitalहॉस्पिटलHasan Mushrifहसन मुश्रीफ