शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

जागतिक स्तरावर खाते उघडणारा शाहू तिसरा कोल्हापूरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 16:05 IST

नेमबाजीची खाण म्हणूनही आता कोल्हापूरच नाव जगाच्या नकाशावर येवू लागले आहे. त्याच परंपरेत आता नव्याने शाहू तुषार माने या सतरा वर्षीय आंतरराष्ट्रीय नेमबाजाचीही भर पडली आहे.

ठळक मुद्देजागतिक स्तरावर खाते उघडणारा शाहू तिसरा कोल्हापूरकरनेमबाजीची खाण म्हणून कोल्हापूरच नाव जगाच्या नकाशावर

सचिन भोसले

कोल्हापूर : करवीरनगरी जशी कलानगरी म्हणून जगप्रसिद्ध आहे, तशीच क्रीडानगरी म्हणूनही सातासमुद्रापार प्रसिद्ध होऊ लागली आहे. या परंपरेनुसारच नेमबाजीची खाण म्हणूनही आता कोल्हापूरच नाव जगाच्या नकाशावर येवू लागले आहे. त्याच परंपरेत आता नव्याने शाहू तुषार माने या सतरा वर्षीय आंतरराष्ट्रीय नेमबाजाचीही भर पडली आहे.

अर्जेंटिना (ब्युईनस एअरज) येथे सुरू असलेल्या युवा आॅलिंम्पिक मध्ये  भारताला प्रथमच रौप्य पदक मिळवून दिले. यापुर्वी कोणत्याही भारतीयाने अशी कामगिरी केल्याची नोंद नाही. त्यामुळे अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय नेमबाज ठरला आहे.शाहूचा जन्म मुळात फुटबॉलच खऱ्या अर्थाने माहेर घर म्हणवणाऱ्या शिवाजी पेठेतील सरदार तालीम परिसरातल. या पेठेत फुटबॉलचे अनेक मोहरे जन्मले. त्यांनी कोल्हापूरच्या शाहू स्टेडीयम पासून देशातील अनेक मैदानही गाजविली.त्यामुळे या परिसरांतून अनेक दिग्गज फुटबॉलपटू या पेठेने दिले आहेत. ही परंपरा असतानाही घरातल्यांनी फुटबॉल  सोडून अन्य खेळात तू जा, असा सल्ला दिला. शाहूला मुळात फुटबॉलची आवड असतानाही नाइलाजास्तव प्रथम शिवाजी स्टेडियम येथील क्रीडा प्रबोधिनीच्या खेळाडूंसोबत धावण्याच्या सराव करीत होता.

यात उन्हाळी सुटीत तेथील काही मुलांनी दुधाळी येथील शूटिंग रेंजवर नेमबाज रोहित हवालदार व आंतरराष्ट्रीय नेमबाज राधिका हवालदार यांनी आयोजित केलेल्या शिबिरामध्ये एक मजा म्हणून सहभाग घेतला.

२०१५ सालची ही गोष्ट. त्यात त्याने पहिल्याच प्रयत्नात ७५ इतके चांगले गुण प्राप्त केले. ही बाब प्रशिक्षकांसह आई आशा व वडील तुषार माने यांच्या लक्षात आली. त्यातून तो मनापासून नेमबाजीमध्ये रस घेवू लागला. त्यानंतर त्याने मागे वळून पाहीले नाही.

शालेय, जिल्हा, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरांवर चमक दाखविली. यातून त्याची निवड जपान येथे झालेल्या आशियाई नेमबाजी स्पधेर्साठी झाली. त्यात त्याने १० मीटर एअर रायफल सुवर्णमयी कामगिरी केली. प्रकारात कास्य पदकाची कमाई केली. त्यानंतर मार्च २०१८ मध्ये सिडनी (आॅस्ट्रेलिया) येथे झालेल्या ज्युनिअर जागतिक स्पर्धेतही त्याने उत्कृष्ट कामगिरी केली.

खरे लक्ष तर त्याचे अर्जेटिंना येथील युथ आॅलिम्पिक वर लागून राहीले होते. या स्पर्धेसाठी पात्र ठरताना शाहूने सिडनी येथील स्पर्धेत पात्रता फेरीत कास्य पदकाची कमाई केली. यासह त्याला कोटापद्धतीतून एक संधी मिळाली आणि त्याने या संधीचे सोने केले. आणि त्याने रविवारी या स्पर्धेतील भारताचे पहिले रौप्य पदक मिळवून आतापर्यंतच्या इतिहासात पहिले खाते खोलण्याचा मानही मिळवला.

लक्ष्याचा अचूक भेद घेण्याची क्षमता असलेला शाहू त्रिवेंद्रम येथे नियमित सराव करतो, तर कोल्हापुरात असल्यानंतर तो रोहित हवालदार यांच्या खासगी नेमबाजी शूटिंग रेंजवर सराव करतो. दिल्लीत असल्यानंतर तो तुघलताबाद येथील शासकीय शूटिंग रेंजवर आंतरराष्ट्रीय नेमबाज व प्रशिक्षक, सुमा शिरुर, दीपाली देशपांडे, दीपक दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. त्याच्या वडिलांचा औषधविक्रीचा व्यवसाय आहे, तर आई गृहिणी आहे.

शिवाजी पेठेत घराघरांमध्ये फुटबॉलचे वेड आहे. मात्र, घरच्यांनी फुटबॉल सोडून दुसरा कोणताही खेळ खेळत जा, असा दरडावून सल्ला दिला. त्यामुळे शाहूने नाइलाजाने फुटबॉलची आवड असूनही त्याचा त्याग केला. शिवाजी स्टेडियमवरील क्रीडा प्रबोधिनीच्या मुलांबरोबर धावण्याचा सराव कर असे वडीलांनी सुचविले. हा सराव करता करात उन्हाळ्याच्या सुटीत मी दुधाळी रेंजवर मजा म्हणून शूटिंग हा खेळ अंगिकारला. पहिल्या प्रशिक्षणातच अचूक लक्ष्य भेदले आणि माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली.

तिसरा कोल्हापूरकरविश्वचषक नेमबाजी स्पर्धेत तेजस्विनी सावंत हिने १० मीटर एअर रायफल प्रकारात विजेतेपद पटकाविले अशी कामगिरी करणारी ती पहिली महीला भारतीय ठरली. त्यानंतर राही सरनोबत हिने २२ आॅगस्ट २०१८ ला एशियाड मध्ये १० मीटर पिस्तल प्रकारात सुवर्ण पदक पटकावित अशी कामगिरी करणारी तीही पहिली भारतीय महीला ठरली.

रविवारी (दि.७) रोजी अर्जेंटिना येथे सुरू असलेल्या युवा आॅलिंम्पिकमध्ये भारताला या स्पर्धेत पहिले रौप्य पदक अर्थात पदक मि ळवून देणारा तो पहिला भारतीय नेमबाज ठरला. या तिघात एकच साम्य म्हणजे हे तिघेही कोल्हापूरच्या मातीतील नेमबाज आहेत. हे विशेषच म्हणावे लागले नव्हे कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुराच म्हणावा लागेल.

शेवटचे दोन शॉटस् चुकले त्यामुळे मी रशियाच्या ग्रिगोरिल शामकोव्ह यांच्यापेक्षा १.७ पॉईटने मागे पडलो आणि माझ सुवर्ण पदक हुकले. ही कसर मी गुरुवारी होणाऱ्या मिश्र दुहेरीत भरुन काढीन.- शाहू माने, आंतरराष्ट्रीय नेमबाज

टॅग्स :Shootingगोळीबारkolhapurकोल्हापूर