शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

शाहू कॉलेजमध्ये पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्येच ‘झुंज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:25 IST

प्रभागाचा कानोसा प्रभाग क्र. १० शाहू कॉलेज विद्यमान नगरसेविका : अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर आताचे आरक्षण : सर्वसाधारण महिला लोकमत ...

प्रभागाचा कानोसा

प्रभाग क्र. १०

शाहू कॉलेज

विद्यमान नगरसेविका : अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर

आताचे आरक्षण : सर्वसाधारण महिला

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक १०, शाहू कॉलेजमध्ये अ‍ॅड. सूरमंजिरी राजेश लाटकर व स्मिता मारुती माने या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये पुन्हा झुंज होणार आहे. येथून गेल्यावेळेला लाटकर यांच्याशी कडवी झुंज दिलेल्या शुभांगी रमेश भोसले याही जोमाने रिंगणात उतरल्या आहेत. पालकमंत्री सतेज पाटील व माजी खासदार धनंजय महाडिक यांनी हा प्रभाग प्रतिष्ठेचा केल्याने येथे जोरदार लढाई पाहावयास मिळणार आहे.

महापालिका निवडणुकीत सर्वच प्रभागात काट्याची टक्कर पाहावयास मिळते. काही प्रभागात पारंपरिक प्रतिस्पर्धी रिंगणात आहेत. यापैकी शाहू कॉलेज हा एक संवेदशनशील प्रभाग आहे. गेल्या निवडणुकीत येथे राष्ट्रवादीकडून अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर व ताराराणी आघाडीकडून शुभांगी भोसले यांच्यात लढत झाली होती. भोसले यांना मारुती माने यांनी पाठिंबा दिल्याने अप्रत्यक्षपणे लढत लाटकर व माने यांच्यातच झाली होती. राजेश लाटकर यांनी केलेली कामे व त्यांचा संपर्क पाहता, भोसले यांनी दिलेली लढत निश्चितच लक्षवेधी होती. लाटकर यांनी १९५४, तर भोसले यांनी ११९४ मते घेतली. शिवसेनेच्या सुनीता लाटकर यांना १५५, बसपाच्या छाया शिंगे यांना १६३, काँग्रेसच्या सुनंदा तेरदाळकर यांना ४३ मते मिळाली होती.

कोल्हापूर शहरातील राजकारणाचा थेट परिणाम या प्रभागावर होतो. लोकसभा व त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजेश लाटकर हे पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासोबत होते. त्याचे पडसाद या निवडणुकीत उमटणार आहेत. सूरमंजिरी लाटकर यांनी विविध ठिकाणी सामाजिक सभागृह, अंतर्गत रस्त्यांसह वैयक्तिक लाभाच्या योजना प्रभावीपणे राबवल्याचे येथील नागरिक सांगतात. त्यांनी नगरसेविका व महापौर म्हणून आपल्या कामाची छाप पाडली आहे. मावळत्या सभागृहातील एक अभ्यासू नगरसेविका म्हणून त्यांनी ठसा उमटवला आहे. त्यात राजेश लाटकर यांचा संपर्क चांगला असल्याचे येथील नागरिक सांगतात.

स्मिता माने यांनीही या प्रभागातून जोरदार तयारी केली आहे. गत पाच वर्षात त्यांनी सदर बाजार प्रभागातून महापालिकेत प्रतिनिधीत्व केले आहे. त्यांचे पती मारुती माने यांचा प्रभागात थेट संपर्क आहे. अडचणीच्या काळात ते मदतीला धावून येतात. कोरोनामध्ये त्यांनी उल्लेखनीय काम केले. याचबरोबर गेल्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शुभांगी भोसले यांनी निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून, पराभवाने न खचता प्रभागात संपर्क कायम ठेवला आहे. गोरगरिबांच्या आरोग्याच्या कामांबरोबरच जनजागृतीचे भरीव काम केल्याचे येथील नागरिक सांगतात.

राष्ट्रवादीकडून अ‍ॅड. लाटकर, ताराराणीकडून माने व भोसले यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. माने व भोसले यांच्यात समझोता करून एकास एक लढत देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्याशिवाय योगिता प्रवीण कोडोलीकर या काँग्रेसकडून इच्छुक आहेत. कोडोलीकर यांनी महापूर व कोरोनाच्या काळात गोरगरिबांना मदत केली आहे. यासह मंगल चव्हाण, श्रेया विजय हेगडे आदी इच्छुक आहेत. काहीजणांनी अद्याप पत्ते खोललेले नाहीत.

प्रभागात प्राॅपर्टी कार्डचा विषय प्रत्येक निवडणुकीत पुढे येतो. किंबहुना या मुद्याभोवतीच प्रचार फिरत असतो. येथील तरुणांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची गरज आहे, तर काही ठिकाणी अवैध व्यवसाय सुरू आहेत. त्याला लगाम लागला पाहिजे, अशा अपेक्षा येथील नागरिकांच्या आहेत. आगामी निवडणुकीत विकास कामांवर प्रचारात धुरळा उडणार असला तरी, येथील निवडणूक शह-काटशहच्या राजकारणाभोवतीच फिरणार आहे. येथील लढत ही तुल्यबळ व लक्षवेधी होणार आहे. त्यामुळे एकमेकांना रोखण्यासाठी साम, दाम, दंड या नीतीचा वापर होणार हे निश्चित आहे.

शिल्लक असलेली कामे -

प्रभागातील ११३० कुटुंबांचे प्राॅपर्टी कार्ड प्रलंबित

झोपडपट्टीच्या ठिकाणी घरकुल योजना राबवणे

काही ठिकाणी ड्रेनेजची गरज

पाच वर्षांतील कामे...

प्रभागात सात सामाजिक सभागृहे

अंतर्गत सर्व रस्ते काँक्रिटीकरण

महिला बालकल्याणतर्फे शिलाई मशीन, आट्टाचक्कीचे वाटप

६०० कुटुंबांंना शौचालये

संजय गांधी, श्रावणबाळ पेन्शन योजना प्रभावीपणे राबवली.

मागील निवडणुकीत उमेदवारांना मिळालेली मते-

अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर (राष्ट्रवादी) - १९५४

शुभांगी भोसले (ताराराणी) - ११९४

छाया शिंगे (बसपा) - १८३

सुनीता लाटकर (शिवसेना) - १५५

सुनंदा तेरदाळकर (काँग्रेस) - ४३

कोट-

पाच वर्षात सात सामाजिक सभागृहे, अंतर्गत रस्ते पूर्ण केले. नागरिकांच्या वैयक्तिक लाभाच्या योजना अतिशय प्रभावीपणे राबवल्या. प्रॉपर्टी कार्डसाठी जीपीएस सर्व्हे केलेला आहे. मात्र टाऊन प्लॅनिंगच्या नियमानुसार मिळकतीधारकांचे नुकसान होते, हे लक्षात आल्यानंतर थोडे थांबलो आहे. आता महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून यावरही निश्चित मार्ग काढू.

- अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर (नगरसेविका)