शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शाहू छत्रपती यांच्या नावाने २९७.३८ कोटी रुपयांची संपत्ती, कसलेही कर्ज नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 09:47 IST

कसलेही कर्ज नाही, मात्र एक गुन्हा अलीकडेच दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : कोल्हापूर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू शहाजी छत्रपती यांच्या नावे स्थावर व जंगम अशी मिळून २९७ कोटी ३८ लाख ०८ हजार रुपयांची संपत्ती असल्याचे त्यांनी संपत्ती विवरणपत्रात नमूद केले आहे. त्यांच्या पत्नी याज्ञसेनीराजे छत्रपती यांच्या नावे ४१ कोटी ०६ लाखांची संपत्ती आहे. विशेष म्हणजे त्यांच्यावर कसलेही कर्ज नाही.

शाहू छत्रपतींची १४७ कोटी ६४ लाख ४९ हजार रुपयांची जंगम मालमत्ता, तर १४९ कोटी ७३ लाख ५९ हजारांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नी याज्ञसेनीराजे यांच्या नावे अनुक्रमे १७ कोटी ३५ लाख व २३ कोटी ७१ लाखांची जंगम व स्थावर मालमत्ता आहे. शाहूंना दागिन्यांचा शौक नसला तरीही एक कोटी ५६ लाखांचे सोन्याचे, तर ५५ लाखांचे चांदीचे दागिने आहेत. 

शाहू छत्रपतींच्या नावावर असलेल्या वाहनांची किंमत सहा कोटी आहे. १२२ कोटी ८८ लाख इतक्या किमतीची शेतजमीन आहे. पत्नी याज्ञसेनी यांच्या नावावर सात कोटी ५२ लाख रुपयांची शेतजमीन आहे.

संजय मंडलिक यांची संपत्ती किती वाढली?कोल्हापूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांची एकूण संपत्ती १४ कोटी ३७ लाख २८ हजार ३९८ रुपये इतकी आहे. मंडलिक यांच्या संपत्तीत २०१९च्या तुलनेत तब्बल ५ कोटी ६५ लाख रुपयांनी वाढ झाली. खा. मंडलिक यांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात जंगम मालमत्ता १ कोटी १५ लाख ३२ हजार ५२५ रुपये असल्याचे म्हटले आहे. तसेच १३ कोटी २१ लाख ९५ हजार ८७३ रुपये किमतीची स्थावर मालमत्ता असल्याचे नमूद केले आहे. 

राजू शेट्टी : मालमत्तेत ५० लाखांची वाढहातकणंगले मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांच्या मालमत्तेत गेल्या ५ वर्षांत ५० लाखांची वाढ झाली आहे. त्यांना शेतकऱ्यांनी फॉर्च्युनर गाडी भेट दिली आहे. त्यांच्या अंगावर विविध वित्तीय संस्थांची ७८ लाख ५० हजारांची कर्जे असून, पत्नी संगीता शेट्टी यांच्यावर १४ लाख ७५ हजार, तर मुलगा सौरभ यांच्या अंगावर ५६ लाख ८१ हजारांची कर्जे आहेत. 

धैर्यशील माने : ३० लाखांनी मालमत्ता कमीहातकणंगले मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांची मालमत्ता ४ कोटी ४५ लाख ६१ हजार रुपये इतकी आहे. गत निवडणुकीपेक्षा ती ३० लाखांनी कमी झाली आहे. गतवेळी माने यांची संपत्ती ४ कोटी ७७ लाख ७१ हजार ३६३ इतकी होती. यात यंदा जवळपास ३० लाख रुपयांनी घट झाली आहे. सध्या माने यांच्यावर २ कोटी १९ लाख रुपयांचे कर्ज आहे. 

सत्यजीत पाटील यांची मालमत्ता साडेतीन कोटींवर  हातकणंगले मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील- सरूडकर यांची स्थावर आणि जंगम अशी एकूण मालमत्ता ३ कोटी ५७ लाख ८३ हजार रुपये असल्याचे त्यांनी दिलेल्या मालमत्ता विवरण पत्रावरून समोर आले आहे. त्यांच्यावर ५ लाख ९३ हजार रुपयांचे कर्ज आहे. त्यांच्याकडे एक इनोव्हा आहे. पत्नी प्राजक्ता यांच्या नावे एक कार आणि मुलगा वीरधवल यांच्याकडे १ लाख ९५ हजार रुपयांची दुचाकी आहे. त्यांच्याकडे रोख १ लाख २५ हजार, तर पत्नीकडे ७५ हजार, मुलाकडे १० हजार रुपये रोख आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपती