शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

आंदळकर यांना ‘शाहू’ पुरस्कार

By admin | Updated: June 23, 2014 00:49 IST

कुस्तीचा सन्मान : कोल्हापुरात गुरुवारी वितरण

कोल्हापूर : येथील राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्यावतीने दरवर्षी दिला जाणारा मानाचा ‘राजर्षी शाहू पुरस्कार’ यंदा हिंदकेसरी पैलवान गणपतराव आंदळकर यांना जाहीर झाला. जिल्हाधिकारी व ट्रस्टचे अध्यक्ष राजाराम माने यांनी आज, रविवारी पत्रकार परिषदेत त्याची घोषणा केली. जिल्हाधिकारी माने म्हणाले, कुस्ती क्षेत्रासाठी हिंदकेसरी आंदळकर यांनी सर्वस्व दिले आहे. पैलवान, कुशल मार्गदर्शक या पातळीवर त्यांनी अतुलनीय कार्य केले आहे. त्याची दखल घेत त्यांच्या आणि कुस्ती क्षेत्राच्या सन्मानार्थ त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. राजर्षी शाहू जयंतीच्या निमित्त गुरुवारी (दि. २६) सायंकाळी ६ वाजता शाहू स्मारक भवन येथे समारंभपूर्वक हिंदकेसरी आंदळकर यांना हा पुरस्कार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते व पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रदान केला जाईल. एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, पुनवत (ता. बत्तीस शिराळा) येथे जन्मलेले हिंदकेसरी आंदळकर हे वयाच्या १५ व्या वर्षी कुस्तीसाठी कोल्हापुरात आले. मोतीबाग तालमीत सराव करून त्यांनी कोल्हापूरचा नावलौकीक देश-विदेशांत केला. पैलवान, मार्गदर्शक, संघटक अशा विविध भूमिकेतून त्यांनी कुस्तीला बळ दिले. कुस्ती एक मिशन समजून ते कार्यरत आहेत. कुस्तीच्या विकासासाठी ते जीवघेण्या आजारातून जिद्दीने उठले आहेत. त्यांना यंदाचा पुरस्कार जाहीर करताना आम्हाला वेगळाच आनंद होत आहे. पत्रकार परिषदेस जिल्हा पुरवठा अधिकारी संजय शिंदे उपस्थित होते. (प्रतिनिधी)पुरस्काराचे २९ वे वर्षसमाजप्रबोधन, साहित्य, कला, संस्कृती, संगीत या क्षेत्रांत मोलाचे योगदान दिलेल्या व्यक्तीस अथवा संस्थेस ‘शाहू’ पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. या पुरस्काराचे यंदाचे २९ वे वर्ष आहे. आतापर्यंत भाई माधवराव बागल, मेहरून्निसा दलवाई, डॉ. व्ही. शांताराम, शाहीर पिराजीराव सरनाईक, डॉ. बाबा आढाव, तर्क तीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, नानासाहेब गोरे, बाबा नेसरीकर, चंद्रकांत मांडरे, कुसुमाग्रज, डॉ. शंकरराव खरात, मायावती, न्यायमूर्ती पी. बी. सावंत, रयत शिक्षण संस्था, जयंत नारळीकर, आशा भोसले, राजेंद्रसिंह, जयमाला शिलेदार, यशवंतराव मोहिते, प्रा. डॉ. एन. डी. पाटील, डॉ. भालचंद्र मुणगेकर, प्राचार्य शिवाजीराव भोसले, डॉ. आ. ह. साळुंखे, कॉ. गोविंद पानसरे, बाबूराव धारवाडे व रा. कृ. कणबरकर, प्राचार्य पी. बी. पाटील यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दुसरे मानकरीकोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल मेघनाथ नागेशकर यांना १९८६, तर राष्ट्रीय पातळीवरील कुस्तीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे गुरू हनुमान यांना १९९१ मध्ये ‘शाहू’ पुरस्काराने गौरविण्यात आले. यावर्षीचा पुरस्कार जाहीर झालेले हिंदकेसरी आंदळकर हे कुस्तीतील दुसरे, तर क्रीडाक्षेत्रातील तिसरे मानकरी ठरले आहेत.