शहरं
Join us  
Trending Stories
1
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
2
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
3
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
4
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
5
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
6
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
8
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
9
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
10
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
11
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास
12
कोण आहे सतीश शाह यांची पत्नी? दोघांना नव्हते मूल; जोडीदाराच्या निधनाने बसला धक्का
13
सामनावीर अन् मालिकावीर! रोहित शर्मा दुहेरी सन्मानावर म्हणाला- "मालिका हरलो असलो तरीही..."
14
Virat Kohli: 'रन मशीन' विराटची गगनभरारी! संगकाराला पछाडलं, आता फक्त सचिन तेंडुलकर पुढे
15
IND vs AUS: रोहितच्या सेंच्युरीसह किंग कोहलीची फिफ्टी; ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरच्या वनडेत अविस्मरणीय शो!
16
मंगळ गोचर २०२५: २७ ऑक्टोबर रोजी मंगळ गोचर; पुढचे दोन महिने 'या' ५ राशींसाठी असणार खास!
17
देशभरात इन्व्हेस्टमेंट स्कॅमचे जाळे; सहा महिन्यांत 30 हजार लोकांची फसवणूक, ₹1500 कोटी लुटले
18
पश्चिम सीमेवर भारताचे तिन्ही सैन्य दल पाकिस्तानची झोप उडवणार; NOTAM जारी, १२ दिवस काय घडणार?
19
LIC वर अदानी समूहात गुंतवणुकीसाठी सरकारी दबाव? वॉशिंग्टन पोस्टच्या दाव्याचे कंपनीने केले खंडन
20
Rohit Sharma Century: रोहितचा मोठा धमाका! सिडनीच्या मैदानात साजरं केलं शतकांचं 'अर्धशतक'

दसरा चौक परिसरात ५० बेडसचे शहाजीराजे कोविड सेंटर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:26 IST

या सेंटरचे उद्‌घाटन माजी आमदार मालोजीराजे, मधुरिमाराजे छत्रपती यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, छत्रपती शाहू शिक्षण संस्थेचे ...

या सेंटरचे उद्‌घाटन माजी आमदार मालोजीराजे, मधुरिमाराजे छत्रपती यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, छत्रपती शाहू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मानसिंग बोंद्रे प्रमुख उपस्थित होते. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिक, रुग्णांना दिलासा मिळावा या उद्देशाने ५० बेडस्‌च्या शहाजीराजे कोविड सेंटरची उभारणी केली आहे. त्यामध्ये अकरा ऑक्सिजन बेडस आहेत. डॉक्टर, नर्सेस यांची १६ जणांची टीम कार्यरत असणार आहे. सवलतीच्या दरामध्ये याठिकाणी औषधोपचार केले जाणार आहेत. या सेंटरसाठी मानसिंग बोंद्रे फौंडेशनची मोठी मदत झाली असल्याचे मावळा कोल्हापूरचे अध्यक्ष उमेश पोवार यांनी सांगितले. रोटरी क्लब ऑफ करवीरच्यावतीने या सेंटरसाठी ऑक्सिजनची २० रिकामी सिलिंडरची मदत करण्यात आली. यावेळी शिवराज नाईकवडे, अश्विन वागळे, रोटरी क्लब ऑफ करवीरचे अध्यक्ष प्रमोद चौगुले, दिलीप प्रधाने, ‘मावळा कोल्हापूर’चे संतोष हेबाळे, युवराज पाटील, उदय देसाई, अभिजित भोसले, ओंकार नलवडे, नामदेव पोवार, विजय चोपदार, अनिकेत सावंत, संदीप चव्हाण, आदी उपस्थित होते.

चौकट

प्रशासनाने लालफितीचा कारभार टाळावा

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना काही सामाजिक संस्था, संघटना स्वयंस्फूर्तीने कोविड केअर सेंटर सुरू करत आहेत. या संस्था, संघटना एकप्रकारे प्रशासनाची मदत करत आहेत. त्यामुळे त्यांना परवानगी देण्यापासून आवश्यक मदत करण्यासाठी प्रशासनाने लालफितीचा कारभार टाळावा. अशा सेंटरना त्वरित परवानगी द्यावी, असे माजी आमदार मालोजीराजे यांनी सांगितले. मावळा कोल्हापूर, मानसिंग बोंद्रे फौंडेशनचा कोविड सेंटर सुरू करण्याचा उपक्रम सामाजिक बांधीलकी जपणारा असून त्यांना आवश्यक ती मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

फोटो (२००५२०२१-कोल-शहाजीराजे कोविड सेंटर) : कोल्हापुरात गुरुवारी शहाजीराजे कोविड सेंटरचे उद्‌घाटन माजी आमदार मालोजीराजे यांच्या हस्ते झाले. यावेळी शेजारी उमेश पोवार, मानसिंग बोंद्रे, मधुरिमाराजे, आमदार चंद्रकांत जाधव, आदी उपस्थित होते.

===Photopath===

200521\20kol_7_20052021_5.jpg

===Caption===

फोटो (२००५२०२१-कोल-शहाजीराजे कोविड सेंटर) : कोल्हापुरात गुरूवारी शहाजीराजे कोविड सेंटरचे उदघाटन माजी आमदार मालोजीराजे यांच्या हस्ते झाले. यावेळी शेजारी उमेश पोवार, मानसिंग बोंद्रे,  मधुरिमाराजे, आमदार चंद्रकांत जाधव, आदी उपस्थित होते.