शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

शहा, मुख्यमंत्री कोल्हापुरात

By admin | Updated: May 23, 2015 00:26 IST

भाजप बैठक : कार्यकारिणीच्या बैठकीचे आज उद्घाटन

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत अधिकार क्षेत्रावरून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि नायब राज्यपाल नजीब जंग यांच्यादरम्यान आठवडाभरापासून सुरू असलेल्या युद्धाला पूर्णविराम देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे शुक्रवारी अधिसूचना काढण्यात आली. अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि बदल्यांचे सर्वाधिकार नायब राज्यपालांना असून, यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत करणे अनिवार्य नाही, असे यात स्पष्ट करीत केंद्राने जंग यांना अप्रत्यक्षरीत्या पाठिंबा दिला आहे.अधिसूचनेमुळे राष्ट्रीय राजधानीत प्रशासनासंबंधी सर्व संभ्रम दूर होऊन आप सरकारला शहराचा कारभार चांगल्यापद्धतीने चालविण्यास मदत होईल, असा दावा केंद्राने केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री केजरीवाल यांनी या अधिसूचनेवरून थेट मोदी सरकारवर तोफ डागली असून, भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी मागील दाराने दिल्लीवर हुकमत गाजविण्याचा आरोप केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे ही अधिसूचना काढण्यात आली आहे.नायब राज्यपालांना पाठिंबा देणारी ही अधिसूचना काढून केंद्र सरकारने दिल्लीतील जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, अशी टीकाही त्यांनी केली. ही अधिसूचना जारी झाल्यानंतर काही तासांतच केजरीवाल यांनी पत्रपरिषद घेतली. ते म्हणाले की, जंग हा केवळ एक मोहरा आहे. त्यांना पंतप्रधान कार्यालयातून आदेश मिळत आहेत. स्वातंत्र्यापूर्वी इंग्लंडची महाराणी येथे व्हाईसरायला अधिसूचना पाठवीत होती. आता जंग व्हाईसराय आहेत, तर पंतप्रधान कार्यालय लंडन. नायब राज्यपालांनी गेल्या आठवड्यात ज्येष्ठ सनदी अधिकारी शकुंतला गामलीन यांची हंगामी मुख्य सचिवपदी नियुक्ती केल्यानंतर सत्ताधारी आम आदमी पार्टीचे सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यादरम्यान संघर्षाला तोंड फुटले होते. केजरीवाल यांनी नायब राज्यपालांच्या अधिकारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून ते प्रशासन आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला होता. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून हस्तक्षेपाची मागणी केली होती. (प्र्रतिनिधी)४भ्रष्टाचार प्रतिबंधक शाखेला केंद्राच्या सेवांतील अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांविरुद्ध भ्रष्टाचाराच्या तक्रारीची दखल घेता येणार नाही या अधिसूचनेतील उल्लेखावरून मोदी सरकार कुणाला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे? असा सवाल केजरींनी केला. ४नायब राज्यपालांनी दिल्लीकरांसाठी वीज व पाणीपुरवठ्याबाबत कधी विचारणा केली नाही. त्यांची रुची केवळ बदल्या आणि नियुक्त्यांमध्येच आहे.४मोदी सरकार भाजपच्या तीन आमदारांना सोबतीला घेऊन मागच्या दाराने दिल्ली सरकार चालविण्याचा प्रयत्न करीत आहे.४अधिसूचनेवर घटनातज्ज्ञांशी मंथन सुरू असून, त्यानुसारच पुढील निर्णय घेतला जाईल, असे केजरीवाल यांनी सांगितले. या घटनाक्रमावरून हे स्पष्ट होते की, पंतप्रधान व गृहमंत्री राजनाथसिंग यांनी भ्रष्टाचार व ट्रान्सफर-पोस्टिंगच्या फोफावत चाललेल्या उद्योगासमक्ष नांगी टाकली आहे. आप सरकारने मागील तीन महिन्यांपासून हा उद्योग बंद पाडला होता.-मनीष सिसोदिया,उपमुख्यमंत्री, दिल्ली४घटनेतील परिच्छेद २३९ एएनुसार नायब राज्यपाल हे दिल्लीचे प्रशासकीय प्रमुख आहेत. ४नायब राज्यपालांकडे सेवा, सार्वजनिक व्यवस्था, पोलीस व भूमीशी संबंधित क्षेत्रांचे अधिकार असतील. सेवेशी संबंधित विषयांवर ते सदसद्विवेक बुद्धीचा वापर करून गरज वाटल्यास मुख्यमंत्र्यांसोबत विचारविनिमय करू शकतात.४सार्वजनिक व्यवस्था, पोलीस, भूमी व सेवा हे विषय राष्ट्रीय राजधानी क्षेत्राच्या विधानसभा चौकटीबाहेर असल्याने एनसीटी सरकारकडे त्यांचे कार्यकारी अधिकार नाहीत.४लाचलुचपत प्रतिबंधक शाखेचे पोलीस केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सेवांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्ह्यांची दखल घेणार नाहीत.४आयएएस, आयपीएस सेवेतील अधिकारी असलेल्या केंद्रशासित प्रदेशांच्या तुकड्या दिल्ली, चंदीगड, अंदमान-निकोबार द्वीपसमूह, लक्षद्वीप, दीवदमण, दादर नगर हवेली, पुडुचेरीसारखे केंद्रशासित राज्य आणि अरुणाचल प्रदेश, गोवा आणि मिझोरामसारख्या राज्यांसाठी समान आहेत आणि गृहमंत्रालयाच्या माध्यमाने केंद्र सरकारद्वारे त्याचे संचलन होते.