शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम महाराष्ट्रात सत्तर टक्के कारखान्यांत स्थापनेपासून सत्तांतर नाही, कारखान्यांची नावे जाणून घ्या

By विश्वास पाटील | Updated: April 27, 2023 12:55 IST

एकदाही सत्तांतर न झालेले कारखाने

विश्वास पाटीलकोल्हापूर : सहकारी साखर कारखानदारीत शेतकरी हिताचा कारभार असेल तर सहसा त्या कारखान्यात सत्तांतर होत नसल्याचे चित्र आहे. पश्चिम महाराष्ट्रात एकूण ३३ पैकी २२ कारखान्यांमध्ये स्थापनेपासून आजअखेर एकदाही सत्तांतर झालेले नाही. छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीनंतर त्याचे पुन्हा प्रत्यंतर आले. कागलमधील शाहूमध्ये संधी मिळत नाही म्हटल्यावर दिवंगत नेते सदाशिवराव मंडलिक व हसन मुश्रीफ यांनी नवीन कारखाना उभारला. तिथे संधी मिळत नाही म्हटल्यावर मुश्रीफ यांनी स्वत:चा कारखाना काढला, असेही घडले आहे.पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात एकूण ५१ कारखाने आहेत. त्यातील ३३ सहकारी आहेत. त्यातील २२ मध्ये स्थापनेपासून एकदाही सत्तांतर झालेले नाही, याचा अर्थ सुमारे सत्तर टक्के कारखान्यात स्थापनेपासून एकाच घराण्याकडे, गटाकडे किंवा व्यक्तीकडे कारखान्याचे नेतृत्व आहे. कोल्हापुरात पंचगंगा कारखान्यात रत्नाप्पाण्णांना शामराव पाटील यड्रावकर व दिनकरराव मुद्राळे यांनी तगडे आव्हान दिले; परंतु, तरीही सत्तांतर झाले नाही. कुंभी-कासारी व भोगावतीत दोन वेळा सत्तांतर झाले. बिद्रीत १९८४ ला हिंदुराव पाटील यांच्याकडून माजी आमदार दिनकरराव जाधव व के.पी. पाटील यांच्याकडून कारखाना काढून घेतला. चंदगडच्या दौलत कारखान्यातही नरसिंगराव पाटील यांचा पराभव करून गोपाळराव पाटील यांनी सत्ता मिळवली.सांगली जिल्ह्यात जत कारखान्यात विलासराव जगताप यांनी एकदा सत्तांतर केले. महाकालीच्या निवडणुकीत सत्तांतर झाले नाही; परंतु, पंडितराव जाधव यांना अध्यक्षपदावरून बाजूला करून नानासाहेब सगरे अध्यक्ष झाले.सातारा जिल्ह्यात यशवंतराव मोहिते व जयवंतराव भोसले या दोन घराण्यात आलटून- पालटून सत्ता राहिली. कारखाना व कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टची मालकी कुणाकडे हा त्यातील कळीचा मुद्दा राहिला. किसनवीरमध्येही दोन वेळा सत्तांतर झाले. जंग जंग पछाडूनही सह्याद्रीमध्ये सभासदांनी कधीच सत्तांतर होऊ दिले नाही.

एकदाही सत्तांतर न झालेले कारखानेकोल्हापूर : वारणा, शिरोळ, शाहू, मंडलिक, शरद, डी.वाय. पाटील, जवाहर, राजाराम, उदयसिंहराव गायकवाड,सांगली : वसंतदादा, राजारामबापू, विश्वासराव नाईक, हुतात्मा, सोनहिरा, क्रांती कुंडल, मोहनराव शिंदे, निनाईदेवी, महाकाली,सातारा : बाळासाहेब देसाई पाटण, सह्याद्री कराड, अजिंक्यतारा सातारा, रयत.

ही सुद्धा आहेत महत्त्वाची कारणे...

  • दोन किंवा त्याहून जास्त टर्म सत्ता राहिल्यास सभासद वाढवले जातात. त्यातून पकड निर्माण होते.
  • सत्ताधारी गट आपल्याला हवा तसा बदल पोटनियमात करून घेतात.
  • विविध माध्यमातून सभासदांशी चांगला संपर्क असतो. त्याच्या मदतीला कारखानदारी येत असते. त्यातून सत्तारूढ आघाडीबद्दल आपलेपणा निर्माण होतो. तोच नंतर मतांत परावर्तित होतो.
  • चांगला दर, वेळेत बिले, सवलतीत साखर मिळावी, एवढीच सभासदांची माफक अपेक्षा असते.
  • ज्यांनी कारखाना उभारला त्या घराण्याबद्दल शेतकऱ्यांच्या मनांत कायमच कृतज्ञतेची भावना असते. त्यामुळे कारखाना त्याच घराण्याकडे राहावा, असाही कल अनेक निवडणुकीत दिसला आहे. 

बाप दाखव नाहीतर...

सध्या साखर कारखानदारीची बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल, अशी स्थिती आहे. चांगला दर हंगामाच्या अगोदर देण्याचे जाहीर केले तरच शेतकरी ऊस घालतात. चांगला दर द्यायचा असेल तर अर्थकारणही तितकेच भक्कम लागते. शेतकरी संघटनांच्या चळवळीचा दबाव असल्याने भ्रष्ट कारभारास लगाम बसला आहे. त्यामुळे गैरव्यवस्थापन, सत्तारूढ गटातील लाथाळी, दुफळी आणि कारखाना नीट चालवता आला नाही तरच लोक बदलाचा निर्णय घेतात. एखाद्या हंगामात वाईट अनुभव आला तरी लगेच सत्तांतर होते असाही अनुभव नाही.

कारखान्याचे नेतृत्व दूरदृष्टीचे असेल, उसाची बिले वेळेत मिळत असतील, शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा मिळत असतील तर सहकारी साखर कारखानदारीत सहसा सत्तांतर होत नाही, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. - विजय औताडे, साखर उद्योगाचे तज्ज्ञ

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने