शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये कधी मिळणार?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा
2
गोवा क्लब अग्निकांड: थायलंडमधून प्रत्यार्पण टाळण्यासाठी लूथरा बंधूंची कोर्टात धाव; वकिलांचा अजब युक्तिवाद
3
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
4
रोहित शर्मा नवा 'सिक्सर किंग'! पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी म्हणतो, "जो विक्रम झालाय तो..."
5
'असा पती कुणालाच भेटू नाही', परागचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध, व्हाट्सॲप स्टेट्‍स ठेवून सरिताने...   
6
‘चल धरणावर जाऊया’, तरुणाने तरुणीला व्हॉट्सॲपवर पाठवला मेसेज, त्यानंतर घडलं भयंकर
7
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
8
मोबाईल रिचार्जपेक्षा कमी किमतीत गुगलने लॉन्च केला सर्वात स्वस्त 'AI Plus Plan'! ChatGPT चे मार्केट खाणार?
9
सोशल मीडियाचा नाद लय बेक्कार! मुलांवर घातक परिणाम, अतिरेकी वापर म्हणजे धोक्याची घंटा
10
मज्जा! 'या' गावातल्या बायकांना स्वयंपाकाचं टेंशनच नाही, वाचून म्हणाल 'मलाही तिथे राहायचंय!'
11
तुम्ही हे होऊच का दिले? इंडिगो संकटावर हायकोर्टाने सरकारला फटकारले; प्रवाशांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश
12
जुने बँक खाते बंद करताय? थांबा! 'या' ५ चुका केल्यास तुमच्या खिशातून कापले जातील एक्स्ट्रा चार्ज
13
Nagpur Crime: अधिवेशन सुरू असताना नागपुरात रक्ताचा सडा, तरुणाची सपासप वार करत हत्या
14
“८ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी करा”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निर्देश
15
Car Offers: निसान मॅग्नाइट, होंडा एलिव्हेटसह 'या' लोकप्रिय मॉडेल्सवर ३.२५ लाखांपर्यंत सूट!
16
अविवाहित मुलीच्या संपत्तीचा खरा वारसदार कोण? कायद्यानुसार कोणाचे असतात प्रथम अधिकार?
17
पोलिसांनी लाईनमनला केली अटक, संतापलेल्या वीज कर्मचाऱ्यांनी असा घेतला बदला, अखेरीस...
18
संतापजनक! "आधी ४ लाख भरा, मग मृतदेह न्या"; बिल पाहून नातेवाईकांचा रुग्णालयावर गंभीर आरोप
19
'या' कर्जमुक्त कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ₹६० पेक्षा कमी आहे किंमत, दमानींचीही गुंतवणूक
20
Travel : भारतातून १००००० रुपये घेऊन थायलंड ट्रिपला निघताय? राहणं, खाणं आणि फिरणं एकूण किती होईल खर्च?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर विमानतळावरुन सात वर्षांत १७ हजार विमानं उडाली, किती प्रवाशांनी केला प्रवास.. वाचा सविस्तर

By पोपट केशव पवार | Updated: June 7, 2025 14:00 IST

राजकीय उड्डाणे सर्वाधिक

पोपट पवारकोल्हापूर : गेल्या २०-२५ वर्षांपूर्वी ज्या उजळाईवाडीच्या माळावर चिटपाखरूही फिरकत नव्हते, त्याच उजळाईवाडी येथे असलेल्या कोल्हापूरविमानतळावरून गेल्या सात वर्षात तब्बल ७ लाख ६४ हजार ६६९ प्रवाशांनी प्रवास केला आहे. १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०२५ या काळात शेड्यूल आणि नॉन शेड्यूलसह तब्बल १७ हजार ६१८ विमानांचे टेकऑफ आणि लँडिंग झाले आहे. काही वर्षांपूर्वी छोटे विमानतळ म्हणून गणल्या जात असलेल्या या विमानतळाची कनेक्टव्हिटी दिवसेंदिवस वाढत असल्याने देशातील प्रमुख विमानतळांमध्ये कोल्हापूर विमानतळ गणले जात आहे.२०१७-१८ मध्ये सुरू झालेल्या कोल्हापूर विमानतळावर गेल्या सात वर्षांत पायाभूत सुविधांबरोबर देशांतर्गत कनेक्टिव्हिटी वाढली आहे. कोल्हापूर विमानतळावरून कोल्हापूर-मुंबई, कोल्हापूर-हैदराबाद, कोल्हापूर-बंगळुरू या मार्गावर रोज विमानसेवा आहे. सध्या हैदराबाद व बंगळुरूसाठी आठवड्यातून तीन दिवस अधिकची विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. कोल्हापूर-अहमदाबाद, कोल्हापूर-नागपूर या मार्गावरही आठवड्यातून तीन दिवस सेवा सुरू केली आहे. या सर्वच मार्गांवरील सेवेला दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सांगलीकरांसह कऱ्हाडचीही सोयपूर्वी विमानाने मुंबईला जाण्यासाठी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील नागरिकांना बेळगावला जावे लागत होते. मात्र, कोल्हापूर विमानतळ सुरू झाल्यानंतर कोल्हापूरकरांची सोय झाली. शिवाय सांगली जिल्ह्यातील व कऱ्हाडच्या आसपासच्या भागातील लोकांनाही कोल्हापूर विमानतळ सोयीचे बनले आहे.कनेक्टिव्हिटी'चा लाभकोल्हापूर-दिल्ली या विमानसेवेसाठीही सध्या चाचपणी सुरू आहे. सध्या कोल्हापुरातून दिल्लीला जाण्यासाठी हैदराबादमार्गे कनेक्टव्हिटी फ्लाइट आहे. शिवाय मुंबई, बंगळुरू येथूनही कनेक्टिव्हिटी फ्लाइट असल्याने कोल्हापूर विमानतळावरून जास्तीत जास्त प्रवासी प्रवास करणे पसंत करतात.राजकीय उड्डाणे सर्वाधिककोल्हापुरात विविध कार्यक्रम, सोहळे व अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या राजकीय लोकप्रतिनिधींची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे गेल्या सात वर्षांत २४१३ नॉन शेड्यूल विमानांचे टेकऑफ आणि लँडिंग झाले आहे. यातून १२०२७ प्रवाशांनी प्रवास केला आहे.सात वर्षांत साडेसात लाख जणांचा प्रवासकोल्हापूर विमानतळावरून २०१८ ते २०२४ या सात वर्षांत तब्बल ७ लाख ६४ हजार ६६९ प्रवाशांनी प्रवास केला आहे. शेड्यूल आणि नॉन शेड्यूलसह तब्बल १७ हजार ६१८ विमानांचे उड्डाण आणि लँडिंग झाले आहे.

दृष्टिक्षेपात प्रवासी अन् विमानेतारीख  - विमाने  - प्रवासी२०१८-२०१९ - ७५५  - १७८४३२०१९-२०२०  -  ३००८  -  १३२०७४२०२० -२०२१ -  २०१८  -  ७१३७१२०२१- २०२२  - २३४८  - ९७८२७२०२२-२०२३  -   २७३४  - १२८७७६२०२३-२०२४  -  ३२२५  -  १५७३२०२०२४-२०२५  -   ३५३०  -   १५९४५८

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAirportविमानतळairplaneविमान