सातवर्षीय स्केटर केदारने मिळविली अ‍ॅथलेटीकमध्ये डॉक्टरेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 01:19 PM2019-12-31T13:19:12+5:302019-12-31T13:20:05+5:30

कोल्हापूर : लहान वयाच्या नेत्रदीपक कामगिरीची दखल घेत विश्वविक्रमवीर स्केटर केदार याला द डायसेस आॅफ आशिया चेन्नई तामिळनाडू यांनी ...

Seven-year-old skater Kedar holds a doctorate in athletics | सातवर्षीय स्केटर केदारने मिळविली अ‍ॅथलेटीकमध्ये डॉक्टरेट

सातवर्षीय स्केटर केदारने मिळविली अ‍ॅथलेटीकमध्ये डॉक्टरेट

googlenewsNext
ठळक मुद्देसातवर्षीय स्केटर केदारने मिळविली अ‍ॅथलेटीकमध्ये डॉक्टरेटसांस्कृतिक आणि अ‍ॅथलेटिकसाठी युनिर्व्हसल अ‍ॅम्बॅसिडर म्हणून निवड

कोल्हापूर : लहान वयाच्या नेत्रदीपक कामगिरीची दखल घेत विश्वविक्रमवीर स्केटर केदार याला द डायसेस आॅफ आशिया चेन्नई तामिळनाडू यांनी डॉक्टरेट इन अ‍ॅथलेटीक ही पदवी चेन्नई येथे एफएफडब्ल्यूचे संचालक डॉ. चिझुको आॅनडेरा आणि संस्थापक अध्यक्ष डॉ. पी. एम. इबेन्जर यांच्या हस्ते देण्यात आली. तसेच सांस्कृतिक आणि अ‍ॅथलेटिकसाठी युनिर्व्हसल अ‍ॅम्बॅसिडर म्हणून निवड झाली आहे.

डॉ . केदार २0२0 मध्ये सिंगापूर येथे होणाऱ्या सेमिनारमध्ये सहभागी होणार आहे. इतक्या लहान वयात डॉक्टरेट मिळवणारा केदार हा भारतातील पहिलाच अ‍ॅथलीट ठरला आहे. कोल्हापूरात जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलिस अधीक्षक दिनेश बारी, मनपा आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, अमोल कोरगावकर यांनी केदारचे स्वागत केले. यावेळी कोरगावकर ट्रस्टतर्फे केदारची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये सचिन टीम टॉपर्सचे स्केटर तसेच कोळी सायकल अकॅडमीचे सायकलवीर सहभागी झाले होते.

वय वर्षे अवघे सात असलेला विश्वविक्रमवीर स्केटर केदारने २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि नागरिक यांना मानवंदना देण्यासाठी आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी तसेच जागतिक शांतता राहावी यासाठी सांगलीच्या शहीद अशोक कामटे चौक ते कोल्हापूर हे ५५ किलोमीटरचे अंतर तिरंगा ध्वज घेउन स्केटिंग करत अवघ्या ३ तास ३८ मिनिटात पूर्ण केले. स्टॉप टूरिझम, शांतता यासह आतापर्यंत ७ विश्वविक्रम त्याने आपल्या नावावर केले आहेत. याशिवाय नवीन विश्वविक्रमाचीही तो तयारी करत आहे.

केदारची चिल्ड्रन्स बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड, आशिया पॅसिफिक रेकॉर्ड, नॅशनल रेकॉर्ड, इंटरनॅशनल बुक आॅफ रेकॉर्ड, गिनिज बुक आॅफ रेकॉर्ड, हायरेंज बुक आॅफ रेकॉर्ड, कलाम बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. याशिवाय बहूजनरत्न रामदास आठवले प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय पुरस्कार, शिवतेज क्रिडा, रायझींग स्टार २0१९, बेस्ट अ‍ॅचीव्हर २0१९ असे आतापर्यंत त्याने ९ सुवर्ण, ७ रौप्य आणि ५ कांस्यपदके मिळवली आहेत.

केदारने वयाच्या पाचव्या वर्षीकोल्हापूर ते अंजनी- सांगली अशी १0५ किलोमीटरची स्केटींग रॅली पूर्ण केली आहे. याशिवाय पाच किलोमीटरमध्ये लोकमतची महामॅरेथॉन स्पर्धा आतापर्यंत तीनवेळा पूर्ण केल्या आहेत. याशिवाय लिम्का बुक आॅप रेकॉर्डचे १९ किमीची पन्हाळा प्रदक्षिणा तसेच १५ किलोमीटरचे ट्रेकिंगही पूर्ण केले आहे.

केदार सध्या विबग्योर हायस्कूल येथे दुसरीत शिकत आहे. या कार्यक्रमास केदारचे प्रशिक्षक शिवाजी मोरे, कपिल कोळी, नगरसेवक राजसिंह शेळके, राजाराम गायकवाड, स्टेट बँकेचे प्रबंधक देव, भारत जाधव, स्वप्निल पार्टे, राज कोरगावकर, आकाश कोरगावकर, विजय साळुंखे, स्वाती गायकवाड आदी उपस्थित होते.

Web Title: Seven-year-old skater Kedar holds a doctorate in athletics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.