शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सात वर्षांच्या मुलीवर बापाकडून अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 18:42 IST

चाळीस वर्षांच्या नराधम बापाने पोटच्या सात वर्षांच्या मुलीवर पाशवी अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार कोल्हापूर शहराला लागून असणाऱ्या उपनगरात शुक्रवारी रात्री घडला. मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर नागरिकांनी मारहाण करीत नराधमाला लक्ष्मीपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ठळक मुद्देसात वर्षांच्या मुलीवर बापाकडून अत्याचारउपनगरातील घटना, मारहाण करीत पोलिसांच्या ताब्यात

कोल्हापूर : चाळीस वर्षांच्या नराधम बापाने पोटच्या सात वर्षांच्या मुलीवर पाशवी अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार कोल्हापूर शहराला लागून असणाऱ्या उपनगरात शुक्रवारी रात्री घडला. मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर नागरिकांनी मारहाण करीत नराधमाला लक्ष्मीपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.पीडित मुलीचा बाप शहरात हमालीचे काम करतो. तो दारूच्या आहारी गेला आहे. रोज घरी दारू पिऊन येत असतो. शुक्रवारी रात्री मद्यधुंद अवस्थेत घरी आला. मध्यरात्री झोपेत असलेल्या आपल्या सात वर्षांच्या मुलीचे तोंड दाबून अत्याचार केला. मुलीच्या ओरडण्याने आई जागी झाली. भेदरलेल्या मुलीची अवस्था पाहून ती घाबरली. तिला शांत करून पतीला बेदम मारहाण केली. आरडाओरडा करून गल्लीतील लोकांना जागे केले.

या प्रकाराची स्थानिक लोकांना माहिती दिल्यानंतर संतप्त नागरिकांनी त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर पोलीस ठाण्यात वर्दी दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संशयितास अटक केली. पीडित मुलीच्या आईने याबाबत तक्रार दिली. शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी पोलीस ठाण्यात भेट देऊन घटनेची माहिती घेतली.पीडित मुलीची सीपीआरमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यामध्ये अत्याचार झाल्याचे निदान पुढे आले आहे. पीडित मुलगी घाबरली असून, तिला तिची आई सावरण्याचा प्रयत्न करीत आहे. बापचं नरभक्षक निघाल्याने नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे.आईचे धाडसनराधम पित्यास दोन मुली व एक लहान मुलगा आहे. घरची परिस्थिती खूपच हलाकीची आहे. मोलमजुरी केल्याशिवाय घरात चूल पेटत नाही. अशा कुटुंबात राहणाऱ्या पोटच्या मुलीवर अत्याचार झाल्याचे लक्षात आल्यावर तिच्या आईने पतीला पाठीशी न घालता धाडसाने पोलिसांत तक्रार दिली. त्यामुळे नराधमास पोलीस कोठडीची हवा खावी लागली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर